वाचा. राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
- मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी राजे यांचे 'मूक आंदोलन'
कोल्हापूर आज (बुधवार) मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली 'मूक आंदोलन' करण्यात आहे. सकाळी ९ पासून आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तसेच आगामी भरतीत मराठा समाजाला न्याय देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा देखील घेतला जाऊ शकतो.
- मुंबई महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक होणार आहे.
- मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
कोरोनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- पुणे मनपाअंर्तगत कोरोना लसीकरण
पुणे मनपा कोरोना लसीकरण ५७ केंद्रावर प्रत्येकी १०० लसीचे वितरण करण्यात येणार आहे.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस
आप पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे.
- मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस
अभिनेत्रा मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे.