राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
- आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक
आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या लसीकरणाबाबतही या बैठकीत आढावा घेतला जाऊ शकतो.
- भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म दिवस
किरण बेदी (अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. शांततेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार ही मिळालेला आहे. ॲज आय सी... नेतृत्व आणि प्रशासन, ॲज आय सी... भारतीय पोलीस सेवा, ॲज आय सी... स्त्रियांचे सक्षमीकरण यासह आदी पुस्तके लिहिली आहेत.
- अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म दिवस
अभिनेत्री सोनम कपूर हीचा आज जन्मदिवस आहे. सोनम हिंदी चित्रपटांतील अभिनेता अनिल कपूर याची कन्या आहे. सावरीया हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता. तर सोनमने दिल्ली ६, थॅंक यू, मौसम, डॉली की डोली या चित्रपटातही काम केलेले आहे.
- अलाहाबाद उच्च न्यायालयाचा वर्धापन दिन
आज अलाहाबाद उच्च न्यायालयाचा वर्धापन दिन आहे. १८६६ मध्ये उत्तरप्रदेशात न्यायालयाची स्थापना झाली होती.