ETV Bharat / state

आमचं ठरलयं! सगळं समसमान, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांसमोर सूचक वक्तव्य - devendra fadnavis

आमचं ठरलं असून, सगळे समसमान असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. शिवसनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रथमच शिवसेनेच्या वर्धापन दिनी होत असलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांसमोर सूचक वक्तव्य
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:20 PM IST

Updated : Jun 19, 2019, 10:24 PM IST

मुंबई - आमचं ठरलं असून सगळे समसमान असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेनेनेसुद्धा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच मैदान साफ झाले आहे. पण, तंगड्यात तंगड्या घालण्याचा धोका अधिक असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांसमोर सूचक वक्तव्य

आपण सर्वजण यावेळी शपथ घेऊ की, ही युती तुटणार नाही फुटणार नाही, हिंदुत्वाचा वसा सोडणार नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

mumbai
शिवसनेच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

येणाऱ्या विधानसभेत युतीला ऐतिहासिक विजय मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी प्रथमच शिवसेनेच्या वर्धापन दिनी होत असलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडला.. यावेळी लोकसभेला निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्धव ठाकरे -

  • आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण होत असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
  • यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
  • भावना महत्वाची आहे भावनेवर युती आधारीत आहे.
  • पवारांना भाजपमध्ये घेऊ नका
  • मैदान साफ झाले आहे. पण तंगड्यात तंगड्या घालण्याचा धोका अधिक असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपण एकत्र आलो तरी हेडलाईन वेगळे होतो तेव्हा पण हेडलाईन होते.
  • सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झालाय.
  • ३७० कलम काढणार म्हणजे काढणारचं
  • आम्ही हिंदू आहोत. म्हटल की काही जणांना पोटशळू होतो.
  • वंदे मातरम म्हणायला लाज का वाटते, ओवेसींवर निशाणा
  • काँग्रेसने त्यांच्या कर्माने सत्ता घालवली
  • मुख्यमंत्र्यांना बोलावले तुमच्या पोटात का दुखते
  • सगळे समसमान पाहीजे
  • तुटणार नाही फुटणार नाही हिंदुत्वाचा वसा सोडणार नाही

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 19, 2019, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.