ETV Bharat / state

Top 10 @ 11 PM : रात्री ११ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - pravin darekar car accident

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

today-top-ten-news-at-9-am
रात्री ११ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jul 9, 2020, 9:09 AM IST

Updated : Jul 9, 2020, 11:08 PM IST

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दोन लाखांचा आकडा पार केला आहे. या आकडेवारीचा विचार करता, राज्यातील एकूण रूग्णसंख्येपैकी 62 टक्के रूग्ण हे पुरुष असून 38 टक्के महिला रूग्ण आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीनुसार 7 जुलैपर्यंत राज्यात 2 लाख 11 हजार 145 रूग्ण कोरोनाबाधित झाले असून यातील 1 लाख 30 हजार 104 रूग्ण हे पुरुष आहेत. तर 81 हजार 41 महिला रूग्ण आहेत. तर, मृतांमध्ये 65 टक्के पुरुष असून 35 टक्के महिलांचा समावेश आहे. या माहितीवरून पुरुष कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

वाचा सविस्तर - राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...

मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच आणि लाखो विद्यार्थ्यांचा हितासाठी आम्ही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताची चिंता करतो. परंतु, बुधवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करून या परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर होण्यासाठी मी तातडीने पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली असून त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते? याची वाट पाहू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाचा सविस्तर - अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम, तरीही यूजीसीच्या निर्णयाची वाट पाहू - उदय सामंत

लखनऊ - आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैन शहरातील महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आले आहे. कानपूरला पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे साथीदारांसह फरार झाला होता. आठ दिवसानंतर तो पोलिसांना सापडला आहे. मात्र, ही अटक होती की आत्मसमर्पण? योगी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.

वाचा सविस्तर - विकास दुबेला अटक की आत्मसमर्पण? खुलासा करा; अखिलेश यादव यांची सरकारकडे मागणी

मुंबई - ठाण्यातील एका जिवंत रुग्णाचे नाव दुसऱ्याला देऊन त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला होता. हा प्रकार कुटुंबीयांना उघडकीस आणला. त्यानंतर आज संबंधित कुटुंबीय आणि भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्यपालांनी समर्थन दिल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

वाचा सविस्तर - ठाणे मृतदेह प्रकरण : भाजप नेत्यांसह पीडित कुटुंबीयांनी राज्यपालांची घेतली भेट

नाशिक - उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबे याने अवैधरित्या शस्त्रे विकल्याचा तसेच सशस्त्र सुरक्षारक्षक देण्याचा ठेका घेतल्याच्या संशयावरून नाशिक शहरातील सातपूर परिसरातील भंगार बाजारात विशेष झडती सत्र राबविल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे सातपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाचा सविस्तर - कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशकात लागेबांधे? भंगार बाजारात झडतीसत्र राबवल्याच्या चर्चांना उधाण

पुणे - आपल्याला रोगाशी लढायचं, रोग्याशी नाही' ही कोरोनाची टॅगलाईन आहे. परंतु, सध्या समाजात याउलट होताना दिसत आहे. बाधित रुग्णावर, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात सापडलेल्या कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वाहनचालकाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कोरोनाने त्यांचा व्यवसायच हिरावला आहे.

वाचा सविस्तर - पुण्यातील 'त्या' कोरोनामुक्त चालकावर बहिष्कार, विदेशातून आलेल्या कुटुंबामुळे झाला होता बाधित

धुळे - पोलिसांनी गांजा तस्कर महिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ५० किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली. शोभा साळुंखे उर्फ शोभा डॉन असे पोलिसांनी छापा टाकलेल्या गांजा तस्कर महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पोलिसांनी शनिनगर परिसरातील या महिलेच्या घरावर छापा मारला. या अगोदरही या महिलेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा सविस्तर - गांजा तस्कर 'डॉन' महिलेच्या घरावर पोलिसांचा छापा; 50 किलो गांजासह जप्त केली रोख रक्कम

मुंबई - मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (गुरुवार) बैठक झाली. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी 'सारथी' संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्याप्रमाणे अवघ्या 2 तासातच अजित पवारांनी सारथीला हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यासंबंधीचे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - अजित पवारांचा कामाचा धडाका, अवघ्या 2 तासातच सारथीला 8 कोटींचा निधी

बीजिंग - गलवान व्हॅली आणि सीमेवरील इतर भागातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यांने प्रभावी उपाय राबविण्याचे आज (गुरुवारी) चीनने म्हटले आहे. वाद असलेल्या भागातून दोन्ही देशांचे सैन्य माघारी घेण्यात येत असतानाच सीमेवरील परिस्थिती स्थिर असून सुधारत असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या आक्रमक धोरणामुळे मागील काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाला होता.

वाचा सविस्तर - सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रभावी उपाय राबविले - चीन

जळगाव - 'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बेशिस्तीचे दर्शन घडवणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे जमावबंदीचे आदेश लागू असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. या कार्यकर्त्यांनी 'फिजिकल डिस्टन्सिंग' धाब्यावर बसवत जोरदार घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन देखील केले. जामनेर तालुक्यातील पहूर येथे हा प्रकार घडला आहे.

वाचा सविस्तर - फडणवीसांच्या स्वागताला तोबा गर्दी; उतावळ्या कार्यकर्त्यांकडून 'फिजिकल डिस्टन्सिंग' धाब्यावर

Last Updated : Jul 9, 2020, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.