मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889 तर 1 नोव्हेंबरला 809 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज 5 नोव्हेंबरला 802 नवे रुग्ण आढळून आले तर 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 886 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा - वुहानमधील संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तुरुंगवास; चीन सरकारची केली होती 'पोलखोल'
- 14,959 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 802 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 16 हजार 101 वर पोहचला आहे. तर आज 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 362 वर पोहचला आहे. आज 886 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 57 हजार 149 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 31 लाख 4 हजार 874 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.48 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 49 हजार 126 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 14 हजार 959 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यूसंख्येत घट -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17 मृत्यूंची नोंद झाली आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 236
ठाणे - 91
अहमदनगर - 103
पुणे - 196
हेही वाचा - अखेर समीर वानखेडेंना हटवले.... नवाब मलिक म्हणाले, ही तर फक्त सुरुवात आहे