मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663 रुग्ण आढळून आले होते. 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281, 21 फेब्रुवारीला 6971, 22 फेब्रुवारीला 5210 रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ होऊन 6218 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
6218 नवीन रुग्ण -
आज राज्यात 6218 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहचला आहे. तर आज 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 857 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.96 टक्के तर मृत्यूदर 2.45 टक्के आहे. राज्यात आज 5869 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 20 लाख 05 हजार 851 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 58 लाख 60 हजार 912 नमुन्यांपैकी 21 लाख 12 हजार 312 नमुने म्हणजेच 13.32 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 79 हजार 288 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 53 हजार 409 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण संख्या वाढली -
राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281, 21 फेब्रुवारीला 6971, 22 फेब्रुवारीला 5210 रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ होऊन 6218 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
आज या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई पालिका - 643
ठाणे पालिका - 142
नवी मुंबई पालिका - 106
कल्याण डोंबिवली पालिका - 107
नाशिक पालिका - 151
अहमदनगर - 69
जळगाव - 160
जळगाव पालिका - 91
पुणे - 308
पुणे पालिका - 679
पिंपरी चिंचवड पालिका - 208
औरंगाबाद पालिका - 197
अकोला पालिका -121
अमरावती - 271
अमरावती पालिका - 515
यवतमाळ - 165
बुलढाणा - 161
नागपूर - 143
नागपूर पालिका - 544
वर्धा - 122