ETV Bharat / state

अमित शाह आज मातोश्रीवर, युतीचा निर्णय होण्याची शक्यता - thackaeray

अमित शाह हे आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित शाह आणि उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 18, 2019, 2:33 PM IST

Updated : Feb 18, 2019, 4:27 PM IST

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होणार आहे. या भेटीत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक एकवटल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेत शिवसेनेची मनधरणी केली आहे. त्यामुळे युतीचा प्रश्न निकाली निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित शाह हे आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीनंतर शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक युती विरुद्ध आघाडी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देण्यात आला आहे. २४-२४ जागा हा फॉर्मुला लोकसभेसाठी शिवसेना-भाजप यांच्यात झाल्याचे समजते. तर विधानसभा निवडणुकीसाठी १४० जागा प्रत्येकी असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मित्रपक्षांसाठी ८ जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचा पंतप्रधान असेल तर राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे. यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हा तिढाही कायम आहे. युतीच्या जागावाटपाबाबत नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेनेने अग्रक्रमावर ठेवले आहेत.

undefined

Intro:अमित शहा आज मातोश्रीवर
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होणार आहे. या राजकीय भेटीत मातोश्रीवर
युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक एकवटल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेत शिवसेनेची मनधरणी केली आहे. यामुळे गेले कित्येक दिवस अडलेला युतीचा प्रश्न आज निकाली निघणार आहे. Body:आज दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते युतीवर शिक्कामोर्तब करतील.त्यानंतर शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करेल.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक युती विरुद्ध आघाडी अशी होईल. लोकसभेसाठी शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 24- 24 जागा शिवसेना भाजप लढतील तर विधानसभा निवडणुकीसाठी 50 - 50 जागांचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मित्रपक्षांसाठी 8 जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे. Conclusion:केंद्रात भाजपचा पंतप्रधान असेल तर राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे, यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हा तिढाही कायम आहे.
युतीच्या जागावाटपाबाबत नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचा प्रश्न शिवसेनेने अग्रक्रमावर ठेवला आहे.
Last Updated : Feb 18, 2019, 4:27 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.