ETV Bharat / state

Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन; स्मारकाचे होणार भूमिपूजन - Bhoomipujan of Lata Mangeshkar memorial in mumbai

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज पहिले पुण्यस्मरण आहे. सात दशकाहून अधिक काळ लतादीदींनी सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या स्वरांनी त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त राज्य सरकारकडून मुंबईच्या हाजी अली परिसरात लता मंगेशकर यांचे स्मारक तयार केले जाणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन आज केले जाणार आहे.

Lata Mangeshkar
लता मंगेशकर
author img

By

Published : Feb 6, 2023, 10:12 AM IST

मुंबई : भूमिपूजनासाठी मंगेशकर कुटुंबातील सदस्य उषा मंगेशकर या उपस्थित राहणार आहेत. राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना राज्य सरकारकडून आदरांजली वाहिली जाणार आहे. या आधीही लता मंगेशकर संगीत अकॅडमी सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात देशातील पहिली लता मंगेशकर संगीत महाविद्यालय अकादमी सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. शासकीय कार्यक्रमात सोबतच आज मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचे कार्यक्रम होत आहे.

सात दशकांची कारकिर्द : हिंदी चित्रपट सृष्टीसहित सर्व भारतीयांच्या मनावर गेली 70 वर्ष लतादीदींच्या गाण्यांनी आणि स्वरांनी अधिराज्य गाजवले आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लता मंगेशकर यांचा जन्म इंदोर येथे झाला होता. त्यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत पाच हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. हिंदी आणि मराठी भाषेतही देशातल्या 20 भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणे गायले आहेत. त्यांनी अगदी देवाच्या आरतीपासून ते पार्टीमध्ये वाजवली जाणारी गीते गायली आहेत. ही सर्वच गीते प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतली. 1945 साली त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

चित्रपटसृष्टीत दिलेले योगदान : यानंतर एका वर्षातच त्यांच्या वाट्याला पहिले हिंदी गाणे आले. या गाण्याचे बोल ‘पा लागूँ कर जोरी’, असे होते. यानंतर लतादीदींनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'मेरी आवाज ही मेरी पहचान है', 'पिया तोसे नैना लागे रे', 'लो चली मे अपने देवर की बारात लेके', 'मेरा दिल ये पुकारे आजा' अशी गाजलेली असंख्य गाणे लतादीदींनी आपल्या स्वरांनी सजवली आहेत. या सर्व गाण्यांना त्यांच्या फॅन्सी भरभरून प्रतिसाद दिला. आजही लतादीदींची गाणी प्रत्येक ठिकाणी वाजवली जातात. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा त्यांचा मोठा फॅन असलेला पाहायला मिळतो. हिंदी मराठी चित्रपटासहित देशातील इतर चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही, त्यामुळे संपूर्ण देशाने प्रेम केलेल्या कलाकारांपैकी एक लता मंगेशकर या ओळखल्या जातात.

हेही वाचा : Lata Mangeshkar Death anniversary : लता मंगेशकर यांची प्रथम पुण्यतिथी, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.