ETV Bharat / state

राज्यात आज कोरोनाचे नवीन २ हजार ३३ रुग्ण, एकूण संख्या ३५ हजार ५८ - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

राज्यात आज (सोमवार) २ हजार ३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज राज्यात ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Today 2033 new corona positive cases found in maharashtra
राज्यात आज कोरोनाचे नवीन २ हजार ३३ रुग्ण
author img

By

Published : May 18, 2020, 10:56 PM IST

मुंबई - राज्यात आज (सोमवार) २ हजार ३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज राज्यात ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद झाली आहे. एकूण मृत्यूंची संख्या १ हजार २४९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २, नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. आज झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत. तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: २१,३३५ (७५७)
ठाणे: २३० (४)
ठाणे मनपा: १८०४ (१८)
नवी मुंबई मनपा: १३८२ (२२)
कल्याण डोंबिवली मनपा: ५३३ (६)
उल्हासनगर मनपा: १०१
भिवंडी निजामपूर मनपा: ४८ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३०४ (४)
पालघर: ६५ (३)
वसई विरार मनपा: ३७२ (११)
रायगड: २५६ (५)
पनवेल मनपा: २१६ (११)
*ठाणे मंडळ एकूण: २६,६४६ (८४४)*
नाशिक: १०६
नाशिक मनपा: ७४ (१)
मालेगाव मनपा: ६७७ (३४)
अहमदनगर: ६५ (५)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १२ (३)
धुळे मनपा: ७१ (५)
जळगाव: २३० (२९)
जळगाव मनपा: ६२ (४)
नंदूरबार: २५ (२)
*नाशिक मंडळ एकूण: १३४१ (८३)*
पुणे: २०४ (५)
पुणे मनपा: ३७०७ (१९६)
पिंपरी चिंचवड मनपा: १६० (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ४२० (२४)
सातारा: १४० (२)
*पुणे मंडळ एकूण: ४६४० (२३२)*
कोल्हापूर: ४४ (१)
कोल्हापूर मनपा: ८
सांगली: ४५
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १०१ (३)
*कोल्हापूर मंडळ एकूण: २१६ (५)*
औरंगाबाद:१६
औरंगाबाद मनपा: ९५८ (३३)
जालना: ३६
हिंगोली: १०४
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: २
*औरंगाबाद मंडळ एकूण: ११२१ (३४)*
लातूर: ४७ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: ११
बीड: ३
नांदेड: ९
नांदेड मनपा: ६९ (४)
*लातूर मंडळ एकूण: १४२ (६)*
अकोला: २८ (१)
अकोला मनपा: २४६ (१३)
अमरावती: ७ (२)
अमरावती मनपा: १०८ (१२)
यवतमाळ: १००
बुलढाणा: ३० (१)
वाशिम: ३
*अकोला मंडळ एकूण: ५२२ (२९)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ३७३ (४)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ३
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ३८७ (५)*
इतर राज्ये: ४३ (११)
*एकूण: ३५ हजार ५८ (१२४९)*

आतापर्यंतचे सर्वाधिक ७४९ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- २३२, ठाणे- ५९, पालघर- ३, नाशिक- १३४, धुळे -१४, जळगाव-२, नंदूरबार- ४, पुणे-१६५, सोलापूर-२३, सातारा-६, सांगली व रत्नागिरी प्रत्येकी १, औरंगाबाद- २७, हिंगोली-५, लातूर- १, नांदेड- ५, अकोला-४०, यवतमाळ- १, नागपूर- २६ रुग्ण सोडण्यात आले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर ), नवी दिल्ली यांनी देशातील २१ राज्यातील ६९ जिल्ह्यांमध्ये कोविड१९ च्या अनुषंगाने समाजाधारित सिरो – सर्व्हे करण्याचे निश्चित केले आहे. सदर सर्वेक्षण पार पाडण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्था आवश्यक तांत्रिक सहकार्य करत आहेत. या ६९ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ऍन्टीबॉडी) शोध या प्रकारे घेण्यात येणार आहे. कोविड१९ प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होईल.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार ४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६०.४७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

*(टीप - आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)*

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.