ETV Bharat / state

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आव्हानात्मक; सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रयत्न

महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. मात्र, तरीही आम्ही उत्तम आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज मांडणार आहोत, असे प्रतिपादन अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले.

सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रयत्न
सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रयत्न
author img

By

Published : Mar 6, 2020, 10:41 AM IST

मुंबई - महाविकास आघाडीचा हा पाहिलाच अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. मात्र, तरीही आम्ही उत्तम आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज मांडणार आहोत, असे प्रतिपादन अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आव्हानात्मक

सर्वांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरेल. रोजगार आणि महसूल विभांगांकडे लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक खात्याकडून मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा आणि तालुका स्तरांवर रोजगार तरुणांसाठी महाविकास आघाडी सरकार करेल, असेही शिंगणे म्हणाले.

हेही वाचा - अजित पवारांची कसोटी! महाविकास आघाडीचा आज पहिला 'अर्थ'संकल्प

महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) विधीमंडळात सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प विधानभवनात मांडण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्वरुपात राज्यात नवे समीकरण उदयाला आले आहे. त्यामुळे या पहिल्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.