मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 मार्च रोजी राज्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आलेली आहे. राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर याची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. वाशी टोल नाक्याजवळ या कारवाईचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
हेही वाचा - पालिकेचे यश; कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाचे १२ रुग्ण झाले बरे
जिल्ह्यांशिवाय इतर राज्यांना लागून असलेली महाराष्ट्राची सीमा सुद्धा सील करण्यात आलेली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून सतत सरकारतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या