मुंबई - विधानसभा निवडणुकासांठी जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. अनेक निष्ठावंतांना काही ठिकाणी डावलण्यात आले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी दिल्याने अशोक पाटील समर्थक नाराज आहेत. उमेदवारी नाकारल्याने पाटील समर्थकांनी मातोश्रीच्या गेटवर धरणे आंदोलन केले. न्याय द्या... न्याय द्या... अशोक पाटील यांना न्याय द्या अशी जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
भांडूप पश्चिममधून अशोक पाटील हे इच्छुक होते. मात्र, त्यांना शिवसेनेने डावलले आहे. त्यांच्याऐवजी रमेश कोरगावकर यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज असून, त्यांनी मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले. अशोक पाटील यांनी न्याय देण्याची मागणी त्यांनी शिवसेनेकडे केली आहे. तसेच तृप्ती सावंत समर्थकांनींही मातोश्रीच्या गेटवरही ठिय्या आंदोलन केले. बांद्रा विधानसभा मतदारसंघात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे बोलले जात आहे.