मुंबई - मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसोबत सामुहिक दुष्कर्म आणि तिचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. संबंधीत पीडित मुलगी दहिसर पूर्व येथे राहते. या आरोपींनी तीला घाबरवून आणि धमकावून दोन वर्षे तिच्यासोबत सामूहिक दुष्कर्म केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आईच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला
आरोपी विशाल टिंगा (वय 22 वर्षे) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तीला तो बेंगलोरला घेऊन जात होता. जेव्हा ही गोष्ट अल्पवयीन मुलीच्या आईला कळाली, तेव्हा तिने दहिसर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना मुलीचे मोबाईल लोकेशन खोपोलीतील टोलनाक्याजवळ मिळाले.
तपासात धक्कादायक माहिती आली समोर
पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, जेव्हा पोलिसांनी मुलीचे मेडिकल केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण मेडिकलमधून असे समजले की मुलगी 6 महिन्यांची गरोदर आहे.
आरोपींना अटक
तपासादरम्यान असेही कळले की या प्रकरणात एकूण 3 व्यक्तिंचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी राम चव्हाण (वय 46 वर्षे) याला दहिसरमधून उचलले. तर, आरोपी मुकुंदन आयार (वय 21 वर्षे) आणि विशाल डिंगा (वय 22 वर्षे) यांना मुलीला पळवून नेताना खोपोली येथे पोलिसांनी पकडले.
हेही वाचा - मित्राच्या पत्नीच्या एकतर्फी प्रेमात पडलेल्या तरुणाने केला मित्राचा खून