ETV Bharat / state

Threats Political Leaders : राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रमाण वाढले - Death threats to political leaders

गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहिला तर राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. फोन, पत्रे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढत आहेत. या धमक्यांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Threats Political Leaders
Threats Political Leaders
author img

By

Published : Jun 15, 2023, 9:09 PM IST

नितीन सातपुते यांची प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या काही दिवसांचा इतिहास पाहिला तर राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. फोन, पत्रे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढत आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते व्यग्र असताना अशा धमक्या आल्या असून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकीय नेत्यांना धमकावण्यासारखेच नाही का? याला जबाबदार कोण, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

लोकशाहीसाठी हा खूप मोठा प्रश्न होत आहे. अशा प्रकाराला वेळीच आळा घातला गेला पाहिजे. येणाऱ्या काळात तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला देखील धमक्या देणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे - राजकीय विश्लेषक विवेक भावसार

सरकारने गंभीर व्हावे : आपल्या देशामध्ये बाबरी मशीद पडण्यापूर्वी हिंदू आणि मुसलमानांमध्ये छोट्या प्रमाणात वादविवाद होत होते. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने हिंदू विचारांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मात्र हिंदू आणि मुस्लिम समाजात मोठी दरी निर्माण झाली. समाजात ते निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे सोशल मीडिया.सोशल मीडिया हा एक भला मोठा राक्षस निर्माण झाला आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर करत आहे. त्यांना खरे आणि खोटे काय याची जाण नसते. त्यामुळे अनेक गोष्टींच्या आहारी जाऊन मला द्वेष निर्माण होतो. यातून धमकी देण्याचे प्रकार वाढले असावे असे मला वाटते, असे भावसार म्हणाले. या धमकी प्रकरणातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सुटले नाहीत. धमकी देणार हा मानसिक विकृत असतो. मानसिक संतुलन बिघडल्याने अशा प्रकार घडल्याची कबुली अनेक धमकी देणाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. खरेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की ब्रेनवॉश केले गेले याचा देखील तपास होणे गरजेचा आहे. समाजासमजातील द्वेष पसरवला जात आहे. हा द्वेष मुख्य किड आहे.

या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या

कडक कारवाईची मागणी : देशातील राजकीय नेत्यांना धमक्या देण्याचे एक सत्र सुरू झाले आहे. देशाच्या आणि राज्याची राजकारणाची की वेगळी परंपरा आहे. देशातील असो किंवा राज्यातील शांतता भंग करण्याचे काम काही नराधम धमक्याद्वारे करीत करीत आहे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीने राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करीत असतील ते त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.

कायदे कडक करा : राजकारणात सक्रिय राजकीय नेत्यांना वारंवार धमक्या येत असतात. धमक्यांचा प्रकार वेगवेगळे माध्यम असतात. आजच्या आधुनिक काळात देखील अशा धमक्यवर कुठल्या प्रकारचा नियंत्रण ठेवता येत नाही. भारतामध्ये या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळे कायदे बनवले गेले आहे. धमक्या आल्यानंतर कोणती कारवाई करता येऊ शकते याविषयीं कायद्यात तरतूद केली आहे. कायदा असून देखील धमकी देणाऱ्याला कायद्याचा धाक राहिलेला नाही. कायदे कडक केले पाहिजे. या नियमवाली तयार केली पाहिजे असे मत नितीन सातपुते यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी मिळावी या हेतूने राजकीय नेत्यांना धमक्या दिल्या जातात. राजकीय महत्वाच्या नेत्यांना धमक्या देऊन प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवणे, याचा उपयोग सामन्य नागरिकांवर दहशद माजवण्यासाठी केला जातो. आशा धमक्या देणाऱ्यांचा वेळेत आणि व्यवस्थित बंदोबस्त करणेगरजेचे. केंद्रसरकारच्या समन्वयाने राज्यसरकार धमक्या देणाऱ्या विरोधात विशेष कायदा किंवा धोरण आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.