ETV Bharat / state

म्हाडाच्या घरांसाठी करा 2 वर्ष प्रतीक्षा; येत्या वर्षभरात हजार घरांची निघणार सोडत - म्हाडा सोडत बातमी

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी घरांची चाचपणी सुरू असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिली. धारावीच्या सेक्टर 5 च्या पुनर्विकासातून म्हाडाला भविष्यात घरे मिळणार असून ही घरे मिळण्यासाठी काही कालावधी जाणार आहे.

thousands-of-mhada-house-will-be-lottery-in-mumbai
म्हाडाच्या घरांसाठी करा 2 वर्ष प्रतीक्षा
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:23 AM IST

मुंबई- सर्वसामान्य माणसाचे घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी म्हाडा प्राधिकरण सोडत काढत असते. परंतु, जमीन उपलब्ध नसल्यामुळे मोतीलाल नगर, गोरेगाव पहाडी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊ शकतो. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी घरांची चाचपणी सुरू असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिली. ते म्हाडा पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळेस म्हाडा इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.

म्हाडाच्या घरांसाठी करा 2 वर्ष प्रतीक्षा

हेही वाचा- 'शाहीन बाग, जामियामधील सीएएविरोधी आंदोलन योगायोग नसून एक प्रयोग'

मुंबईत सोडत काढण्यासाठी म्हाडाकडे जागेची कमतरता आहे. तर पुनर्विकासासाठी कमी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे पुनर्विकासातून म्हाडाला घरे मिळण्याची शक्यता कमी आहे. धारावीच्या सेक्टर 5 च्या पुनर्विकासातून म्हाडाला भविष्यात घरे मिळणार असून ही घरे मिळण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे येत्या 1 ते दीड वर्षात घरे मिळण्याची शक्यता असल्याचे मधू चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर म्हाडाच्या दुरुस्ती मंडळांच्या कामांचा आढावा स्वतः मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी वित्त संस्थांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे आश्वासन दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिले आहे.

तर सध्या शासनाकडून जुन्या उपकार प्राप्त इमारती आणि पंतप्रधान आवास योजना प्रकल्पांसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. पीएमजीपीच्या 66 इमारती लवकर विकसित होतील, असेही घोसाळकर यांनी सांगितले.

Intro:मुंबई ।

सर्वसामान्य माणसाचे घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी म्हाडा प्राधिकरण सोडत काढत असते. परंतु जमीन उपलब्ध नसल्यामुळे मोतीलाल नगर, गोरेगाव पहाडी हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊ शकतो. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी घरांची चाचपणी सुरु असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी आज दिली. ते म्हाडा पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळेस म्हाडा इमारत दुरुस्ती आणि पुनरचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.Body:मुंबईत सोडत काढण्यासाठी म्हाडाकडे जागेची कमतरता आहे तर पुनर्विकासासाठी कमी प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे पुनर्विकासातून म्हाडाला घरे मिळण्याची शक्यता कमी आहे. धारावी च्या सेक्टर 5 च्या पुनर्विकासातून म्हाडाला भविष्यात घरे मिळणार असून ही घरे मिळन्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे येत्या 1 ते दिड वर्षात घरे मिळण्याची शक्यता असल्याचे मधू चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर म्हाडाच्या दुरुस्ती मंडळांच्या कामांचा आढावा स्वतः मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असून म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी वित्त संस्थांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे आश्वासन दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिले आहे.
तर सध्या शासनाकडून जुन्या उपकार प्राप्त इमारती आणि पंतप्रधान आवास योजना प्रकल्पांसाठी विशेष लक्ष देण्यात येत असून पी एम जी पीच्या 66 इमारती लवकर विकसित होतील असेही घोसाळकर यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.