मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी पोलिस बाजुला करा मग बघा अस म्हटलेय याला प्रत्युत्तर देताना मग तुम्ही ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा दुर करा मग बघा काय होते ते बघा असा थेट इशारा पेडणेकर यांनी दिला आहे. नारायण राणे खोट बोलत असल्याचेही महापौरांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेची मुदत आज संपत आहे. आपला कार्यकाळ संपताना महापौरांनी हा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई बाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर नोटीस देण्यात आली आहे. भाजपात प्रवेश केल्यावर अनेकांवरची कारवाई थांबली आहे. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग लोकांवर कारवाई करतात आणि जर ते भाजपमध्ये सामील झाले तर ते लगेच स्वच्छ होतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यशवंत जाधव हे भूमिपुत्र आहेत ते कागद आणि कायद्यातील लढाई सुरू आहे. ते त्याला सामोरे जात आहेत. त्यामुळे राजकारणाचा स्तर घसरतोय असे महापौरांनी सांगितले. दिशा सालीयन मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री असा फोन करणार नाहीत, राणे खोटे बोलत आहेत, फोन केला तर पुरावे दाखवा असे आवाहन महापौरांनी केले.
कोरोना काळात मुंबईकरांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले त्याबद्दल महापौरांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. आज पालिकेचा कार्यकाळ संपत आहे. पुढील काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार आहे. आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील त्यांनी दिलेली जबाबदारी मी पुर्ण करेल असे महापौर म्हणाल्या.
हेहीवाचा : Municipal Elections Postponed : महापालिकांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलणार?