ETV Bharat / state

National Gallantry Award : महाराष्ट्रात प्रथम तायक्वांदो खेळणाऱ्या अंध मुलाला यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार - राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

महाराष्ट्रात प्रथमच तायक्वांदो खेळणाऱ्या अंध मुलाला यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. अंध मुलाच्या नेत्रदीपक कामगिरीने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. भारत सरकरकडून या अंध मुलाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार आहे. कृष्णा निमेश शेठ असे या अंध बालकाचे नाव आहे.

National Gallantry Award
अंध मुलाला यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
author img

By

Published : Jan 15, 2023, 7:57 PM IST

अंध मुलाला यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

मुंबई - तायक्वांदो खेळणाऱ्या अंध मुलाला यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मार्शल आर्ट्स, रॉक क्लाइंबिंग, दिल्ली ते मुंबई सायकलिंग असे अनेक साहसी खेळ जिंकले या अंध मुलाने जिकंले आहेत. कृष्णा सेठ, असे या अंध मुलाचे नाव आहे. एव्हढेच नाही तर, इंडिया बुक रेकॉर्ड, मॅजिक बुक रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड्सवरी कृष्णाने आपले नाव कोरले आहे.

National Gallantry Award
कृष्णा सेठला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

शौर्य पुरस्काराने करणार सन्मान - कृष्णा निमेश शेठ हा १७ वर्षांचा अंध मुलगा निसर्गात: काही गुण घेऊन जन्माला आला आहे. त्यांने प्रत्येक आव्हानाचा सामना करत लढाया जिंकल्या आहेत. अंध असूनही अनेक दृष्टी असलेल्या मुलांना लाजवेल असे काम त्याने केले आहे. कृष्णा निमेश शेठला 2022 साठी बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांची केंद्र सरकारकडून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय अंध बालकांच्या स्पर्धेमध्ये यश- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अंध बालकांच्या स्पर्धेमध्ये यश कृष्णा सेठने मिळवलेले आहे. कृष्णाकडे त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अपंग म्हणूनच पाहत होत्या. त्यांनी नेहमीच दुखावणारे शब्दाचे डागच दिले त्यामुळे कृष्णाच्या आयुष्यात काही काळ अडथळा निर्माण झाला. त्यांनी केलेल्या अपमान कारक वागणुकीमुळे त्याच्या मनावर मोठा आघात झाला. त्याच्या आईने मात्र त्याला भरारी देण्यासाठी मोलाची साथ दिली. आईने त्याचे संगोपन करताना भरपूर आशावाद शिकवला त्यामुळेच अनेक आव्हानं जीवनात आली तरी तो डगमगला नाही असे, त्याचं म्हणणं आहे. त्याच्या आईचे नाव निकिता तर, वडीलांचे नाव निमेश सेठ आहे. घरकाम करुन आईने त्याला लहानचे मोठे केले आहे. आईकडूनच मी स्वप्न बघायला शिकलो असे देखील कृष्णा म्हणतो.

2021 -22 यावर्षी कृष्णा सेठ याने विविध स्पर्धेत विजय मिळवला आहे. दहावीच्या परीक्षेत तो 90 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. यानंतर त्याचा सत्कार महाराष्ट्राभर करण्यात आला. पण यामध्ये त्याचे अपंगत्व कुठेही आड आलेले नाही. त्याला प्रत्येक आव्हानाला सर करण्यासाठी कोणी अडवू शकले नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर चुका करत करत शिकण्याची तयारी असल्यावर कोण कोणाला अडवू शकतो. राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पन्नास सुवर्ण 37 रौप्य, 28 कांस्यपदक जिंकली आहेत. त्याने महाराष्ट्रातील आपल्या अंध बालकांच्या सर्व मुलांपैकी अनोखी नेत्र दीपक कामगीरी करीत मान उंचावलीच आहे.

कृष्णाचं आंतरराष्ट्रीय यश - मार्शल आर्ट या लोकप्रिय कलेमध्ये त्याने योगदान दिले आहे. त्यामुळे त्याचा कोरियन दूतावासाकडून विशेष सत्कार करण्यात आला आहे. त्यानंतर दिल्ली ते मुंबई असा सायकलने त्याने प्रवास केला. अत्यंत थक्क करणारा हा प्रवास होता. या वयामध्ये असा प्रवास आणि तोही अंध असणाऱ्या बालकाने केला. सर्वसाधारण डोळस असणाऱ्या सायकल स्वारांसोबत त्याने हा प्रवास केला. त्या वेळेलाच याची झलक उपस्थित लोकांना पाहायला मिळाली.

रॉक क्लाइंबिंग केले पादाक्रांत - आशियातील सर्वात लांब त्रिओलिन ट्रॅव्हर्स सारखा 1 हजार 900 फूट उंचीचा पल्ला त्याने पालथा घातला. हे सर्वसाधारण प्रौढ माणसांना देखील जमणं मुश्किल असतं. परंतु त्याने धैर्याने ते पदाक्रांत केलं. त्यानंतर 3 हजार 500 फूट उंचीवरील आशिया खंडातील सर्वात लांब अशा ट्रायओलीयन्व्हर्स या ठिकाणी त्याने धाडसी पद्धतीने ते पर्वत चढण उतरण सहज पार केले. तर, 'बरमा ब्रिज जंपिंग ते रिवर्स बंजी जंपिंग' पर्यंत त्याने अत्यंत चित्त थरारक असा तो प्रवास पर्वतांच्यामधून देखील पार केला. त्याच्याकडे ही महत्त्वकांक्षा आली कुठून? ज्याला नित्य अपमानाला सामोर जावं लागत होतं त्याने त्या सर्व अपमानाला गिळून उर्जेमध्ये कृष्णाने केलं आहे. त्याची आई, मावशी ह्या त्याच्या प्रेरणा आहेत.

विक्रमांची यादी पाहा - कृष्णा सेठला यामुळेच 2017 या वर्षी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये विक्रम करता आला होता. 2019 ला कृष्णाला पाचवा ध्येयपूर्ती पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता. तर, 2020 त्याला 'भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी खेल रत्न पुरस्कार दिला गेला. 2021 या वर्षी 'आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी 'मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील त्याने नोंद केली. त्याच्या शाळेने ही त्याच्या या अष्टपैलू खेळाडूची स्टार स्टुडन्ट म्हणून गौरव देखील केला.

शाळेविरुद्ध देखील लढला - कृष्णाच्या विरोधात त्याच्या शाळेने केस नोंदवली होती. शाळा कांदिवली मध्ये आहे मात्र त्यानेच शाळेला कोर्टात खेचले. सोळा वर्षाच्या पट्ट्याने शाळेला हरवले. कांदिवली येथील शाळातल्या मुख्या प्राचार्य साईबाबा शेट्टी, विश्वस्त संदीप गोयंका स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळा यांच्या विरोधात मुलांची काळजी, संरक्षण अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016 या कायद्याच्या कलम 92 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. कृष्ण हा जन्मापासूनच अंध आहे. तो गुणवंत विद्यार्थी आहे तरी, त्याला मानसिक छळ सोसावा लागला. पोलीस देखील त्याची तक्रार घेत नव्हते. मात्र, हा हिम्मतवान मुलगा मागे हटायला तयार नव्हता. त्यामुळेच ही कठीण लढाई ज्याने जिंकली. त्याच्या मावशीने देखील त्याला साथ दिली.

आईच्या पाठिंबा - तो त्याच्या मनोगतात, माझी आई निकिता, मावशी तारलीका मेहता यांनी माझी जडघडणीत मोलाची सोबत दिली. आईच्या पाठिंब्यानेच हे सर्व करू शकलो. मी भारतातील अंधार बालक आहे, जो तायक्वांदो खेळतो. हे सर्वांसाठी मी भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच उंच 3 हजार 500 फूट रुंदी 1 हजार 900 फूट पर्वतावर देखील दोनरीच्या सह्याने गेले आहे. दिल्ली ते मुंबई राष्ट्रीय प्रतीक देखील मी होतो. राष्ट्रगीत सर्व राष्ट्रीय टीमचा हिस्सा देखील झालोय. इंडिया बुक रेकॉर्ड, मॅजिक बुक रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड देखील केले आहे. केंद्र २०२२ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.