मुंबई : आरोपी सातत्याने त्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करत होता. त्यामुळे अखेर ही तक्रार पोलिसात आणि नंतर न्यायालयात दाखल झाली. 32 वर्षे आरोपी हा सातत्याने त्या अल्पवयीन मुलीच्या मागे मागे फिरत असे, तिला त्रास देत असे. 'आजा आजा' म्हणत स्वतःजवळ येण्यासाठीचे आवाहन तिला करत असे. हातवारे देखील करत असे. त्यामुळेच न्यायालयाने या संदर्भात पोस्को कायद्याच्या कलम अनुसार सुनावणी केली. दिंडोशी सत्र न्यायालयाने 2015 मधील घडलेल्या या घटनेबाबत आरोपीला पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरवले.
पंधरा वर्षाच्या बालीकेला त्रास : सुमारे सात वर्षांपूर्वी 2015 या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा वर्षाच्या बालीकेला आरोपीने त्रास देणे सुरू केले. बालिका ही त्यावेळेला इयत्ता दहावीत शिकत होती. ती रोज शाळेमध्ये आणि क्लासला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. ती जेव्हा रस्त्याने जात असे, त्या वेळेला तिच्यासमोरच तो यायचा. 'आ जा' 'आ जा' असे तिला म्हणत तिच्याशी लैंगिक छळ करायचा. तो सातत्याने सायकलवरून तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे तिला रोज क्लासला जाणे अशक्य होऊन बसले होते.
तक्रार पोलिसांकडे दिली : या संदर्भात दहावीमध्ये शिकणाऱ्या त्या बालिकेने न्यायालयासमोर सांगितले की, पहिल्या दिवशी क्लासला जात असताना आजूबाजूच्या नागरिकांची तिने मदत घेतली. त्यावेळेला नागरिकांना बघून तो आरोपी तिथून निसटला. मात्र तिने ही सगळी घडलेली घटना तिच्या शिक्षक आणि आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तो आरोपी सातत्याने आपल्या इमारतीच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षकाचे काम करत असताना दिसला. मुलीने त्या आरोपीला पाहिले आणि ओळखले अखेर तक्रार पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र मार्च 2016 मध्ये आरोपीला जामीन दिला गेला.
लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण : आरोपीने त्याला कुटुंब आहे. तीन वर्षाचे मुल असून तो गरीब असल्याचे कारण देत जामीनाची विनंती केली होती. सप्टेंबर 2015 मध्ये जेव्हा त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये दिंडोशी सत्र न्यायालयाने एक वर्षांनी जामीन मंजूर केला होता. ही केस अंडर ट्रायल म्हणून नोंदवली गेली होती. त्यामुळे दिंडोशी सत्र न्यायालयाने अखेर या 32 वर्षीय पुरुषाला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यानुसार दोषी ठरवले आहे.