मुंबई गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शनिवार आणि रविवार असल्याने अनेक गणेशोत्सव मंडळ आपल्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या तयारी लागले होते. लालबागमधील प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास रस्ते भरून वाहत होते. तुडुंब गर्दीत चोरट्यांनी मात्र, भाविकांचे खिसे साफ केले.
तब्बल 72 मोबाईल चोरीला गेले लालबाग तसेच मुंबईतील गर्दी होणाऱ्या ठिकाणी भाविकांनी आपल्याकडील मौल्यवान वस्तू जसे की सोन्याचे दागिने, पाकिटं आणि मोबाईल जपून ठेवा. चोरट्यांपासून सावध राहा. मुंबईत प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा पार पडला. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी तब्बल 72 मोबाईल चोरले आहेत. याबाबत काळाचौकी पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरवर्षी गर्दीचा घेऊन भाविकांचे मोबाईल आणि पाकीट चोरीचे अनेक गुन्हे घडत असतात. त्यामुळे गणपती भाविकांनी गर्दीचा फायदा घेऊन लूट करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं आवश्यक आहे.