मुंबई : संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, केंद्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालयाने राकॉंचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली. त्यानंतर संजय राऊत यांनी केंद्रीय सभा शेतकऱ्यांच्या संदर्भात सवाल उभा केला. ते म्हणतात,"जे विरोधी पक्षात आहेत आणि जे लढत आहेत त्यांना दबाव तंत्राद्वारे दाबण्याचा प्रयत्न होतो. याबाबत अनेकांना अटक देखील केली गेलेली आहे. हे अटकतंत्र आपण पाहिले आहे आणि यामध्ये मला देखील गोवण्याचा प्रयत्न झाला होता."
हसन मुश्रीफ लढवैय्य नेते : हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहे.. ते लढत आहेत, ते संघर्ष आहे. काही लोकांनी त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याची भाषा केली होती आणि त्यामुळेच त्या दिशेनेच कारवाई होते की काय हे वाटणारी ही छापेमारी आहे. जे भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत नाही त्यांच्यावर अनेक प्रकारचे दबावतंत्र वापरले जाते. हे तंत्र देशभर सुरू आहे, हे आपण जाणून आहोत. हसन मुश्रीफ हे कोणत्याही कारवाईला डगमगणारे नाही. ते लढवय्ये नेते आहेत आणि ते हर क्षणी लढत राहतील." सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर संजय राऊत यांनी माहिती दिली की,"काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडे देखील दोन तास सुनावणी झाली; परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामधील सर्व सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग असेल किंवा इतर असेल या ठिकाणी स्वायत्त संस्थांवर दबाव असल्यामुळे आधी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पूर्ण होऊ द्यावी, मग ही सुनावणी घ्यावी."अशी मागणी केल्याची माहिती देखील राऊत यांनी पत्रकारांना दिली.
फुटीरतावाद्यांसाठी भाजपचे आधीच नियोजन : स्वायत्त तपास यंत्रणांवर दबाव आहे हे स्पष्ट करत असताना ते म्हणाले," हे सांगण्याचे कारण की, जेव्हा या संदर्भातली सुनावणी सुरू होती आणि याबाबत जे प्रमुख मंडळी होती त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये जो अविर्भाव आणि ताणतणाव आणि दबाव हा जो दिसत होता. त्यावरूनही लक्षात येत नव्हते हे स्पष्ट पणाने जाणवले. पक्षपात म्हणून आपण जो शब्द वापरतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. " शिवसेनेमधून जे फुटीर गेले, त्यांच्या बाबत भाजपचे आधीपासूनच नियोजन होते. या संदर्भात ईटीव्ही भारतच्या वतीने संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की," काल-परवा एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात असलेले गिरीश महाजनांनी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री यांच्यासमोरच कबूल केलेले आहे की, त्यांचे हे मिशन खूप आधीपासून होते. त्यांनी नियोजनबद्धरित्या या फुटीरांना फोडले आणि त्याची एक प्रकारे कबुलीच गिरीश महाजन यांनी दिल्याचे विधान संजय राऊतांनी केले.
राज ठाकरे-अदानी भेटीवर बोलणे टाळले : राऊत यांनी पुढे नमूद केले की गिरीश महाजन यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हटले की, शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते आणि ते मिशन यशस्वी झाले. हे विधान करताना मुख्यमंत्री त्यांच्या बाजूलाच बसलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांनी हा पक्ष संपवला ही जी हाकाटी आणि फुटीर करतायेत ती किती खोटी आहे, हे गिरीश महाजन यांच्या या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होते, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले. हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेलो हे देखील तेजस सांगत आहे ते खोटे आहे, हे देखील परवाच्या गिरीश महाजन यांच्या विधानावरून पूर्त सिद्ध झालेले आहे. राज ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट हा काय बोलण्याचा विषय नाही, असे म्हणत त्यांनी या भेटीवर भाष्य करण्याचे टाळले.