मुंबई : अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचे सर्वच गैरसमज दूर केले आहेत. कारण नसताना आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांच्यासमोर बोलत होते. माध्यमे जे काही दाखवत आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तसेच 40 आमदारांच्या सह्या घेण्याचा प्रश्नच नाही. असेही पवार म्हणाले. माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घायचे कारण नाही. त्यांच्या मुख पत्रात त्यांनी त्यांना हवे ते लिहावे पण आमच्या बाबत नाही. आमच्या पक्षा बाबत आमचे प्रवक्ते बोलतील. शिंदे गटाचे प्रवक्ते पण काय काय बोलतात. ते पक्ष घेऊन आले तर आम्ही बाहेर पडू. अरे बाबा थांबा. असे काय करू नका? अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे. त्या विभागाचे सचिव या सर्वांना समजायला पाहिजे होते कार्यक्रम कशी घ्यायला हवा होता.
भाजप प्रवेशाबाबत तथ्य नाही : माझ्या बाबत ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही. कुठल्याही प्रकारच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. वेगवेगल्या पक्षाचे नेते त्याबाबत भाष्य करतात त्यात काहीही तथ्य नाही. सर्व जण मला कामानिमित्त भेटत असतात तसे भेटत आहेत. या तुमच्या ज्या बातम्या दाखवल्या जातात. त्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होतो. या मध्ये काही तथ्य नाही आहे हे मी सांगू इच्छितो. अवकाळी पाऊस, बेरोजगारी, गारपीठ,७५ हजार कामगार भर्ती अजून होत नाही. कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत भेटत नाही आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद आहेत. तुमचे काय चालले आहे. माझ्या देवगिरी निवास थानाबाहेर कॅमेरे लावले जातात. माझी आग्रहाची विनंती आहे. तुम्हीच संभ्रम निर्माण करत आहात असे पवार म्हणाले.
-
"Not true, many rumours spread about me": NCP's Ajit Pawar on talks of switching to BJP
— ANI Digital (@ani_digital) April 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/NeH5HZhCyn#AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #Maharashtra pic.twitter.com/FUVpofqfA9
">"Not true, many rumours spread about me": NCP's Ajit Pawar on talks of switching to BJP
— ANI Digital (@ani_digital) April 18, 2023
Read @ANI Story | https://t.co/NeH5HZhCyn#AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #Maharashtra pic.twitter.com/FUVpofqfA9"Not true, many rumours spread about me": NCP's Ajit Pawar on talks of switching to BJP
— ANI Digital (@ani_digital) April 18, 2023
Read @ANI Story | https://t.co/NeH5HZhCyn#AjitPawar #NCP #MaharashtraPolitics #Maharashtra pic.twitter.com/FUVpofqfA9
माझ्याबद्दल गैरसमज : विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या बातमीत तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आम्ही सर्व राष्ट्रवादीत आहोत आणि पक्षातच राहू, असे अजित पवार म्हणाले. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. इतर राजकीय पक्षांचे नेते याबाबत बोलत आहेत. मात्र यावर मी बोलणार नाही, असे अजित पवार म्हणाले. स्वतः पवार साहेबांनी सांगितले आहे की या सर्व तथ्यहीन गोष्टी आहेत. मी कुणाचीही सही घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारने ठरवले आहे आम्ही एकत्र लढणार. जे चालू आहे ते थांबले पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांचा अधिकार आहे. वेग वेगळ्या चौकशा सुरू आहेत. केजरीवाल यांची सुद्धा ९ तास चौकशी झाली. खारघर बाबत आम्ही आमची मागणी केली आहे. काही गोष्टी विपरह्यास करून दाखवल्या जातात त्यावर विश्वास ठेऊ नका असे पवार म्हणाले.
-
#WATCH | All these are baseless & wrong rumours. I appeal to all to stop such rumours," NCP leader Ajit Pawar amid speculations of him joining the BJP.#Maharashtra pic.twitter.com/zlQdXse2ft
— ANI (@ANI) April 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | All these are baseless & wrong rumours. I appeal to all to stop such rumours," NCP leader Ajit Pawar amid speculations of him joining the BJP.#Maharashtra pic.twitter.com/zlQdXse2ft
— ANI (@ANI) April 18, 2023#WATCH | All these are baseless & wrong rumours. I appeal to all to stop such rumours," NCP leader Ajit Pawar amid speculations of him joining the BJP.#Maharashtra pic.twitter.com/zlQdXse2ft
— ANI (@ANI) April 18, 2023
कामासाठी आमदार भेटलो, गैरसमज नको : काळजी करू नका आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढउतार झाले आहेत. सध्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. अजित पवार म्हणाले की, आपण पक्षातच राहणार असल्याच्या बातमीत तथ्य नाही. कामानिमित्त आमदारांची भेट घेतली. यातून दुसरा अर्थ काढू नका, असेही अजित पवार म्हणाले. मी राष्ट्रवादीचा आहे असे, प्रतिज्ञापत्रावर लिहू का? असा सवालही अजित पवार यांनी आज उपस्थित केला. अजित पवार म्हणाले की, एकाही पत्रावर 40 आमदारांच्या सह्या नाहीत.
नव्या समीकरणाची चर्चा : अजित पवार यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे आरोप फेटाळुन लावले आहेत. नवीन समीकरणांच्या फक्त चर्चा सुरू आहेत. त्यात तथ्य नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, माध्यम खोट्या बातम्या पसरत आहे. तसेच विरोध कारण नसतांना बदनामी करण्यासाठी असे अफवा पसरवत असल्याचे पवार म्हणाले. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातही काही कार्यक्रम रद्द केले. तेव्हापासून अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. खुद्द शरद पवार यांच्या विधानाचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव असल्याचे रोखठोकमध्ये लिहिले होते. आता नव्या समीकरणाची चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावली आहे.