ETV Bharat / state

शिक्षकांना द्या लोकल प्रवासाची मुभा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेशी मागणी - mumbai local tran news

इयत्ता दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला आहे. तसेच 14 जूनपासून शालेय कामकाजही सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहे. त्यामुळे शासनाने शाळेसंबंधित कामांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदकडून करण्यात आली आहे.

लोकल
लोकल
author img

By

Published : Jun 6, 2021, 4:37 PM IST

Updated : Jun 6, 2021, 5:18 PM IST

मुंबई - इयत्ता दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत राज्य शासनाने आदेश काढला आहे. तसेच 14 जूनपासून शालेय कामकाजही सुरू होत आहे. अशा परिस्थितीत लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहे. त्यामुळे शासनाने शाळेसंबंधित कामांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदकडून करण्यात आली आहे.

बोलताना शिवनाथ दराडे

निकालाचे काम अत्यंत महत्त्वाचे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीचा निकाल शाळा स्तरावर तयार करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. इयत्ता दहावीच्या निकालाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. हा निकाल वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे 14 जूनपासून शालेय कामकाजही सुरू होत आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे आवश्यक होणार आहे. तसेच माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड, शिक्षणाधिकारी कार्यालय यासोबत शाळेशी निगडीत अन्य कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामांसाठी जावे लागते.

शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा

मुंबईतील 70 टक्के मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना खासगी वाहनातून प्रवास करणे अडचणीचे होते. त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षकांचा अडचणी लक्षात घेऊन उपनगरी लोकल सेवेत शिक्षकांना प्रवासात मुभा देईल, अशी माहिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली आहे.

हेही वाचा - राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री घेणार आज बैठक

Last Updated : Jun 6, 2021, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.