ETV Bharat / state

Gujarat Success formula : गुजरात यशाचा फॉर्म्यूल्याची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात काय आहे स्थिती - राज्य सरकारमध्ये मोठे बदल

गुजरातमधे भाजपने ऐतिहासिक विजय (Historic victory of BJP) मिळवला. (Gujarats formula for success ) या निवडणूकांच्या आधी राज्य सरकारमध्ये मोठे बदल (Major changes in state government) करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या विजयानंतर भाजप महाराष्ट्रासह (what is the situation in Maharashtra) विविध राज्यात आगामी निवडणूकांमधेही हा फॉर्म्यूला लागु करु शकतो असे अंदाज राजकिय जाणकार बांधत आहेत.

Gujarats formula
गुजरात यशाचा फॉर्म्यूला
author img

By

Published : Dec 13, 2022, 8:04 PM IST

मुंबई: गुजरात मधे भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा नव्या मंत्रिमंडळात रुपाणी सरकारचा एकही मंत्री किंवा दिग्गज नेता नव्हता. 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने सरकारमधील सर्व चेहरे बदलले. यावेळी तिकीट वाटपातही 182 पैकी 103 नवीन चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले. पाच मंत्री एक माजी उपमुख्यमंत्री आणि अनेक दिग्गजांसह 38 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली. हा फेर बदलच गुजरात निवडणुकीच्या यशाचा फॉर्मूला (Gujarats formula for success ) ठरला. आणि भाजपने गुजरातच्या 60 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक जागा जिंकण्याचा (Historic victory of BJP) आणि एका राज्यात 86 टक्के जागा मिळवण्याचा विक्रमही केला. आता याच सुत्राची सर्वत्र चर्चा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये हा फॉर्म्युला कुठे आणि कोणत्या स्वरूपात लागू होणार याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात या सुत्रा नुसार काय होऊ शकते (what is the situation in Maharashtra) हा पण चर्चेचा विषय आहे.

नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी : गुजरातच्य यशा नंतर भाजपच्या निवडणुका जिंकण्याच्या तंत्रा बाबत असे सांगितले जाते की भाजपकडे जींकण्याचे एक अनोखे तंत्र आहे आणि भारतीय जनता पक्षाने ते उत्तमरीत्या आत्मसात केल्याचे गेल्या काही निवडणुकांवरून दिसत आले आहे. जनतेला नेमके काय हवे आहे जनतेचा रोष दूर करायचा असेल तर काय द्यायला पाहिजे याचे गणित जमवत भाजपने गुजरात मध्ये यश मिळवले. पक्षातील जुनी मंडळी बाजूला सारत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे पक्षाला यश मिळत असल्याच जाणकार सांगतात.

भाजपने विश्वास मिळवला : गुजरात मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 156 जागा जिंकत भाजपाने अभूतपूर्व असं यश मिळवले. पक्षांमध्ये आणि जनतेमध्ये भाजप विषयी विश्वास निर्माण झाला ज्याचे फलित त्यांना निवडणुकीच्या निकालांमधून पाहायला मिळाले भारतीय जनता पक्षाने हीच पध्दत आधी महाराष्ट्रात सुद्धा राबवली होती. महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याच पक्षातील विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यासारख्या जुन्या आणि लोकांमध्ये मान असलेल्या नेत्यांना दूर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 106 जागा जिंकता आल्या होत्या.

महाराष्ट्रातील आव्हाने : गुजरात मध्ये भारतीय जनता पक्ष हा तळागाळात पोहोचलेला पक्ष आहे ग्रामपंचायत सदस्या पासून ते अगदी पंतप्रधान पदापर्यंतच्या उमेदवारापर्यंत भाजपने आपली पाळमुळे रोवली आहेत. मात्र तरीही जनतेचा रोष भोगावा लागू नये म्हणून भाजपाने पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भारतीय जनता पक्षाला हे गुजरात मध्ये शक्य झाले कारण स्वबळावर सत्ता स्थापन करण्या इतके बहुमत भाजप कडे राहणार याची खात्री होती. मात्र महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची भाजपाची अजूनही ताकद वाढलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असल्याने साठ वर्षांवरील नेत्यांना दूर सारताना अत्यंत काळजीपूर्वक आणि हुशारीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. तसेच सोबत कोणता पक्ष येतो आणि त्यांच्याशी काय समीकरणे होतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

कोणावर येणार संक्रात : भारतीय जनता पक्षात सध्या सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे दिग्गज आणि जुने नेते आहेत ज्यांनी साठी पार केली आहे. मंत्रिमंडळातील हे चेहरे वगळता अन्यमंत्र्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. अथवा ते नवीन आणि तरुण चेहऱ्याचे मंत्री आहेत. त्यामुळे या मंत्र्यांना हळूहळू कमी महत्त्वाची खाती देऊन त्यांना मंत्रिपदाच्या अथवा सत्तेच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा पक्षाचा प्रयत्न असु शकतो. आगामी निवडणुकीत हे नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केली. यात राधाकृष्ण विखे पाटील हे जरी साठ वर्षांवरील नेते असले तरी ते अन्य पक्षातून आयात केले गेलेले नेते आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्या बाबतीत वेगळा विचार होऊ शकतो मात्र सुरेश खाडे आणि अतुल सावे या मंत्र्यांनाही पुन्हा संधी मिळेल याची शाश्वती देता नाही असेही सपाटे यांनी स्पष्ट केले.

भाजपा गांभीर्याने लढतो : भारतीय जनता पक्ष हा निवडणुका अतिशय गांभीर्याने लढणारा पक्ष आहे त्यासाठी ते अत्यंत तळागाळात जाऊन बांधणी करतात निवडणुकांच्या फार पूर्वीपासून त्यांनी तयारी केलेली असते अन्य पक्ष जेव्हा निवडणुकांचा विचारही करत नाही तेव्हा भाजपाची अर्धी तयारी झालेली असते असे म्हटले तर वावगे ठरू नये, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाने जनतेच्या भावना ओळखून त्याप्रमाणे उमेदवार देणे अथवा रणनीती आखणे हे सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी जनतेचा रोष असलेले मंत्री अथवा नेते यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला सुरुवात केली आणि त्याचा त्यांना सर्व निवडणुकांमध्ये फायदा होताना दिसतो आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा पश्चिम उपनगरामध्ये भारतीय जनता पक्षाचा बराच प्रभाव आहे या ठिकाणी या नवीन निकषांच्या आधारे उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अन्य पक्षांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे असेही जोशी यांनी सांगितले.

भाजपमधे आयारामांची जंत्री : माजी मंत्री बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), माजी राज्यमंत्री संजय सावकारे (भुसावळ), माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित (नंदुरबार), माजी मंत्री संजय देवतळे (वरोरा) आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), राम कदम (घाटकोपर पश्चिम), प्रशांत बंब (गंगापूर), लक्ष्मण जगताप (चिंचवड), अजित घोरपडे (तासगाव), शिवाजीराव नाईक (शिराळा) माधव किन्हाळकर (भोकर) सुनिल देशमुख अमरावती राधाकृष्ण विखे-पाटील, सुजय विखे-पाटील, नगर - शिर्डी, हर्षवर्धन पाटील,इंदापूर विजयसिंह मोहिते-पाटील, अकलुज, कालिदास कोळंबकर मुंबई वडाळा, रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलुज,उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले,सातारा, मधुकर पिचड, वैभव पिचड,( अकोले) गणेश नाईक, संदीप नाईक,(नवीमुंबई) चित्रा वाघ, मुंबई डॉ. भारती पवार,(नाशिक) निरंजन डावखरे, किसन कथोरे ( ठाणे) रणजितसिंह नाईक-निंबाळकर,उस्मानाबाद राणा जगजितसिंह पाटील, उस्मानाबाद धनंजय महाडीक, कोल्हापूर निर्मला गावीत, नाशिक, जयकुमार गोरे, सातारा -माण,) प्रसाद लाड( मुंबई ), प्रशांत ठाकूर, पनवेल) प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह ( पश्चिम उपनगर मुंबई) रविशेठ पाटील, रायगड मदन भोसले ( वाई- सातारा) हे सध्या भाजपात आयात केलेले उमेदवार आहेत

शिवसेनेच्या बंडखोरांचा वापर : भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत अनेक नेते अन्य पक्षातून आयात केले आहेत या आयात नेत्यांना उमेदवारी देऊन त्यातील सुमारे 70 टक्के नेते पुन्हा विजयी झाल्यामुळे भाजपाला यश संपादन करता आले आहे भारतीय जनता पक्ष आता पुन्हा एकदा सत्तेत आला आहे त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षातील आणखी काही नेत्यांना थेट गळाला लावले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही नाराज आमदार यांचा समावेश होऊ शकतो काँग्रेसमधीलही काही आमदार भाजपासाठी सध्या मवाळ भूमिकेत असल्याचे दिसते. त्यामुळे जर परिस्थिती अधिक चिघळली तर काँग्रेस राष्ट्रवादी मधील किमान सात ते आठ आमदार भाजपच्या गोटात जाऊ शकतात. यामध्ये असलम शेख, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी मधील रायगड जिल्ह्यातील काही नाराज नेते हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे समजते. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे 40 बंडखोर आमदार हे आता भाजपाच्या दिमतीला असणार आहेत. निवडणुका जाहीर होईपर्यंत जर परिस्थिती आणखी बदलली तर या 40 आमदारांपैकी काही आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळेल अशी शक्यता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे.

सर्वेक्षणाच्या आधारावर उमेदवारी : भारतीय जनता पक्ष निवडणुका अतिशय गांभीर्याने घेणाऱ्या पक्ष आहे. प्रत्येक निवडणुकीत नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेची असो की लोकसभेची प्रत्येक मतदारसंघाचा अंतर्गत सर्वे केला जातो. या सर्वेच्या आधारे जो उमेदवार लोकांच्या पसंतीचा ठरतो आहे, त्यालाच उमेदवारी दिली जाते. यातही सत्तरीच्या पुढे गेलेल्या उमेदवारांचा पत्ता कट केला जातो नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो मात्र तरीही जो सर्वेक्षणाच्या आधारे वरच ठरतो त्यालाच उमेदवारी दिली जाते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन पाटील यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने पाहता आगामी निवडणुकांमध्ये गतवर्षाप्रमाणेच आयारामांना संधी देण्याबरोबरच जे सर्वेक्षणात आघाडीवर आहेत मग ते कोणत्याही पक्षात असत त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही बिस्कीन पाटील यांनी म्हणले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.