ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत प्रसार वाढतोय पुन्हा 300 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद - Mumbai Corona Update

मुंबईत गेल्या दोन दिवसां पासून कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढताना (The spread is increasing in Mumbai ) दिसत आहे. शनिवारी ३३० नव्या रुग्णांची नोंद झाली ( Recorded more than 300 corona patients again) आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १९२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

Mumbai Corona Update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : May 28, 2022, 7:49 PM IST

मुंबई: मुंबईत शनिवारी ३३० नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत ( Mumbai Corona Update ). आज १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार ६०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४३ हजार १०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३१३८ दिवस इतका आहे.

मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२२ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३३० रुग्णांपैकी ३१० म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७२ बेड्स असून त्यापैकी ६८ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण नोंदवल्या गेले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली. २३ मे ला १५०, २४ मे ला २१८, २५ मे ला २९५, २६ मे ला ३५०, २७ मे ला ३५२, २८ मे ला ३३० रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Water Supply Cut : मंगळवारी कांदिवली बोरिवली दहिसर व मालाडमध्ये पाणी पुरवठा बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.