मुंबई- विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker) झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे गेले. शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंनी हा ठराव जिंकला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’असा केला. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवूनआनंद व्यक्त केला.
सविस्तर लवकरच..