ETV Bharat / state

Sadhvi Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण! साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची याचिका कोर्टाकडून अंशतः मंजूर

author img

By

Published : Jan 12, 2023, 11:02 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भाजप खासदार साधवी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात याचिका केली होती. दोषमुक्त आरोपींची संबंधित साक्षीदाराचा जबाब एनआयएकडून खटल्याला उशीर होण्यासाठी नोंदवण्याकरिता बोलवण्यात येत आहे. अशा साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात येऊ नये, असा अर्ज केला होता. तसेच, हा खटला जलद गतीने चालवण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली होती. या अर्जाला आज गुरुवार (दि. 12 जानेवारी)रोजी झालेल्या सुनावणीत अंशतः सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर
साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालया आरोपी साधवी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटले की साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याच्या टप्प्यावर आहे. न्यायालयाने 295 साक्षीदार तपासले आहे. वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेत ठाकूर यांनी सादर केले होते, की एनआयए खटल्याला जाणूनबुजून उशीर करत आहे. ती जलद गतीने चालवण्याची मागणी केली होती. तिने दावा केला की फिर्यादी साक्षीदारांना बोलावत आहे जे आरोपीशी संबंधित नाहीत. वकील जे पी मिश्रा यांनी अनेक उदाहरणे उद्धृत केली होती. जेव्हा असंबद्ध साक्षीदारांना NIA ने त्यांची केस सिद्ध करण्यासाठी बोलावले होते. सुनावणीच्या दिवशी फिर्यादीने त्यांच्या अनुपलब्धतेबद्दल व्हाट्सअप संदेश किंवा ईमेल सादर केले होते.

अंशत: परवानगी : एनआयएच्या वतीने युक्तीवादा दरम्यान असे सांगितले की साक्षीदारांना वगळले जाऊ शकत नाही कारण ते आरोपीशी संबंधित नाही. एनआयएने खटल्याला विलंब करण्यासाठी साक्षीदारांना विनाकारण सुरक्षित केले असा अंदाज लावणे चुकीचे आहे. उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम साक्षीदाराला न्यायालयात, फिर्यादीने हजर केले पाहिजे हा मुख्य नियम आहे. विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंशत: परवानगी दिली आहे.

काय आहे प्रकरण : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

विद्यार्थीदशेत स्पष्टवक्ता : प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा जन्म २ फेब्रुवारी १९७० रोजी झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर या मध्य प्रदेशातील (भिंड जिल्हा) मध्यमवर्गीय कुशवाह राजपूत कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर होते. कौटुंबिक पार्श्‍वभूमीमुळे त्यांनी संघ आणि विहिंपमध्ये प्रवेश केला. ते भोपाळमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित होते. प्रज्ञा नेहमीच उजव्या विचारसरणीच्या संघटनांशी संबंधित असतात. तसेच, त्या विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा दुर्गा वाहिनीशी संबंधित होत्या. भिंडच्या लहर कॉलेजमधून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रज्ञाकडे विद्यार्थीदशेत स्पष्टवक्ता म्हणून पाहिले जात होते.

हेही वाचा : राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना न्यायालयाचा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.