ETV Bharat / state

'यास' चक्रीवादळामुळे मुंबईतून जाणाऱ्या "या" रेल्वे आज रद्द - मुंबई- हावरा रेल्वे

26 मे रोजी 'यास' चक्रीवादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे विभाग सतर्क झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई-हावडा रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई
mumbai
author img

By

Published : May 26, 2021, 2:35 AM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गुजरातला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचे नवे चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे भारतीय मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून मुंबई-हावडा मार्गावरील विशेष रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये 'तौक्ते' चक्रीवादळ धडकले. यामुळे बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास नावाचे नवीन चक्रीवादळ धडकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

या गाड्या रद्द

मध्य रेल्वे मार्गावर 25 मे 2021 ते 26 मे 2021 रोजी सुटणारी विशेष 02259 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा रेल्वे आणि 26 मे 2021 व 27 मे 2021 रोजी सुटणारी 02260 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष रेल्वे रद्द केली आहे.

या राज्यांमध्ये यासचा परिणाम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'या चक्रीवादळाचे केंद्र पोर्ट ब्लेअरपासून ६०० किलोमीटर दूर आहे. येत्या २४ तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. 26 मे रोजी हे चक्रीवादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल'. दरम्यान, या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मच्छिमार, किनारपट्टी भागातील लोकांना इशारा

वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टी भागांना इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात राहणार्‍या लोकांना, विशेषत: मच्छिमारांना या काळात समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यास वादळाची तीव्रता मागील वर्षी आलेल्या 'अम्फान' वादळाप्रमाणेच असू शकते. गेल्या वर्षी जून महिन्यात अम्फान चक्रीवादळ आले होते. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसला होता.

हेही वाचा - पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावे; विरोधातील जीआर रद्द करायला भाग पाडू - काँग्रेसची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.