ETV Bharat / state

मंत्रालय हे कंत्राट माफियांचा अड्डा, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप - The ministry is the base for contract waivers

नवी मुंबईत जे प्रधानमंत्री आवास योजनेचे कंत्राट देण्यात आलेत त्यासाठी १४ हजार कोटींची घरे बनवण्याच्या योजना आहे. त्या योजनेसाठी केवळ चार लोकांना कंत्राट देण्यात आले आहेत तर बाकी लोकांना यामध्ये येऊ दिले नाही. यामुळे यात भ्रष्टाचार झाला आहे. यामागे भाजपाच्या निवडणूक अर्थकारणाचा भाग आहे. आणि यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईतील गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

मुंबईतील गांधी भवनातील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
author img

By

Published : Aug 29, 2019, 6:39 PM IST

मुंबई - मंत्रालय हे सध्या कंत्राटदार माफियांचा अड्डा बनला आहे. त्यासाठी ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट देण्यासाठी नियमांमध्ये बदल केले जात आहेत आणि यामुळे मेट्रो आणि पंतप्रधान आवास योजनेत ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट देण्यात आली आहेत. यामागे भाजपाच्या निवडणूक अर्थकारणाचा भाग असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून दोन्ही ठिकाणच्या सर्व कंत्राटांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सावंत यांनी केली. मुंबईतील गांधी भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्रालय हे कंत्राट माफियांचा अड्डा, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप

सावंत यांनी सांगितले, नवी मुंबईत जे प्रधानमंत्री आवास योजनेचे कंत्राट देण्यात आलेत, त्यासाठी १४ हजार कोटींची घरे बनवण्याच्या योजना आहे. त्या योजनेसाठी केवळ चार लोकांना कंत्राट देण्यात आले आहेत तर बाकी लोकांना यामध्ये येऊ दिले नाही. यामुळे यात भ्रष्टाचार झाला आहे. यामागे भाजपाच्या निवडणूक अर्थकारणाचा भाग आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी.

कॅपा साईड, शापुर पालन जी, एल अँड टी आणि शिर्के या चार कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आले आहेत. तर पाचव्या एनसीसी नागार्जुन या कंपनीला या योजनेत कंत्राट मिळणारच नाही, अशी सोय अगोदरच केली हेाती. त्यामुळे या कंपनीने केवळ मदत केली म्हणून तिला आता मेट्रोमध्ये दुसरे कंत्राट देण्यात आले.

अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार होत आहेत. चारच कंपन्यांना हे कंत्राट मिळावे यासाठी नगरविकास विभागाने रचना केली. तर अनेक अधिकाऱ्यांनी सिडकोच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या कार्यालयात बसून हे कंत्राट बनवले आहे. यात नगरविकास विभागाचे अधिकारी सामील आहेत. यात ठराविक कंपन्या आणि नगरविकास अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे सांगत याप्रकाराचे राज्यात मोठे कंत्राट रॅकेट सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Intro:
मंत्रालय हे कंत्राट माफियांचा अड्डा बनलाय : - सचिन सावंत
mh-mum-01-cong-sachinsavant-tender-7201153

मुंबई, ता. २९ : मंत्रालय हे सध्या कंत्राटदार माफियांचा अड्डा बनला असून त्यासाठी ठराविक कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठी वाट्टेल त्या नियमांमध्ये बदल केले जात आहेत. यामुळेच मेट्रो आणि पंतप्रधान आवास योजनेत एकाच कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या सर्व कंत्राटांची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तसेच हे सर्व कंत्राट देण्यासाठी भाजपाचे निवडणूक अर्थकारणही असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई गांधी भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी सांगितले की, नवी मुंबईत जी प्रधानमंत्री आवास योजनेचे कंत्राट देण्यात आले त्यासाठी १४ हजार कोटींची घरे बनवण्याच्या योजना आहे. त्या योजनेसाठी केवळ चार लोकांना कंत्राट देण्यात आले, बाकी लोकांना येऊ दिले नाही. यामुळे यात भ्रष्टाचार झाला असून यामागे भाजपाच्या निवडणूक अर्थकारणाचा भाग आहे,यामुळे या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जावी. त्यातही ज्या चार कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आले त्यात कॅपा साईड, शापुर पालन जी, एल अँड टी आणि शिर्के यांना हे कंत्राट देण्यात आले..तर पाचव्या एनसीसी नागार्जुन या कंपनीला या योजनेत कंत्राट मिळणारच नाही, अशी सोय अगोदारच केली हेाती. त्यामुळे या कंपनीने केवळ मदत केली म्हणून तिला आता मेट्रो मध्ये दुसरे कंत्राट देण्यात आले असून यात ठराविक कंपन्या आणि नगरविकास अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरेापही सावंत यांनी केला.
मंत्रालय हे कंत्राट माफियांचा अड्डा बनला आहे.. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा सर्व प्रकार होत आहेत. चारच. लोकांना कंत्राट मिळावे यासाठी नगरविकास विभागाने कंत्राट आणि त्यासाठी रचना केली..अनेक अधिकाऱ्यानी सिडकोच्या कार्यालयात नव्हे तर कंत्राटदारांच्या कार्यालयात बसून हे कंत्राट बनवले आहे.. यात नगरविकास विभागाचे अधिकारी सामील असून राज्यात मोठे टेंडर रॅकेट सुरू असून त्याचा लाभ भाजपाच्या निवडणूक अर्थकारणाशी आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला.Body:मंत्रालय हे कंत्राट माफियांचा अड्डा बनलाय : सचिन सावंत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.