ETV Bharat / state

लटकणाऱ्या वायरी काढून 15 दिवसांत मुंबई सुंदर करणार - आदित्य ठाकरे

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद सुरू आहे. या वादावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 7, 2021, 6:38 PM IST

मुंबई - मुंबई सुंदर दिसावी म्हणून पुढील 15 दिवसांत शहरात लटकणाऱ्या ओव्हरहेड वायरी काढून टाकल्या जातील, अशी माहिती र्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्याचबरोबर मुंबईमध्ये इंटिग्रेट ट्रान्सपोर्ट सिस्टम उभारणे, कॉमन तिकीट सिस्टम, मुंबईमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमीगत टाक्या उभारणे, मिनी पंपिंग स्टेशन उभारावेत आदी प्रकल्पांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई बाहेर खासगी बस रोखणार

पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत आढावा बैठका घेतल्या. या बैठकांनंतर आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बेस्टच्या विषयावर चर्चा झाली. देशभरात कॉमन तिकीट प्रोग्राम म्हणजेच देशभरात सर्व वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी बेस्ट कितपत तयार आहे याचा आढावा घेण्यात आला. मुंबईत मोठ्या प्रमाणात खासगी बसेस येतात. त्यासाठी शहराबाहेर चेक नाक्यांवर या बसेसचा प्रवास संपवून त्यामधील प्रवाशांना बेस्टच्या बसेस आणि मेट्रोमधून प्रवास करणे शक्य आहे का यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

छोटी पंपिंग स्टेशन उभारणार

मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी साचते. मुंबईत पाणी साचण्याची 380 ठिकाणे आहेत. ही ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. माहुलच्या पंपिंग स्टेशनला केंद्र सरकारची अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी छोटी पंपिंग स्टेशन उभारली जातील, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. मुंबईमध्ये रस्ते आणि पतपथे चालण्यायोग्य करणे, रस्त्यावरील लाईटचा उजेड पदपथावरही पडावा, अशी सुविधा केली जाईल असेही ठाकरे म्हणाले.

संभाजीनगरचा वाद मिटेल

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद सुरू आहे. याबाबत बोलताना या वादावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेथील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आपण दोन दिवसात जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

त्यांनी टीका करावी आम्ही काम करू

भाजपकडून सतत होणाऱ्या टिके संदर्भात बोलताना ते टीका करत असतात. त्यांना टीका करू द्या. आम्ही आमचे काम करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - नामांतरावरून तापले महाराष्ट्रातील राजकारण

हेही वाचा - एसईबीसी अंतर्गत राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया- गृहमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.