ETV Bharat / state

'सिध्दार्थ महाविद्यालयाच्या रखडलेल्या विकासकामासाठी सरकारने निधी द्यावा... अन्यथा' - Mumbai news

फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे या इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने 9 कोटींच्या निधीची तरतूद केली. तो निधी तत्काळ उपलब्ध करुन देत महाविद्यालयाचे दुरूस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

edited photo
edited photo
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:18 PM IST

मुंबई - फोर्ट येथील सिध्दार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे या इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे आज कॉलेजला भेट देत या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला आहे. पण, राज्य शासनाला याचे सोयरसुतक नाही, त्यामुळे राज्य सरकारने हा 9 कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला नाही तर या महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

कॉलेजच्या पहाणी नंतर बोलताना दरेकर म्हणाले की, या महावािद्यालयाच्या इमारतीला सुमारे शंभर वर्षे उलटून गेली आहेत. आम्ही सर्वजण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होतो. राज्य सरकार मेट्रोसाठी करोडो रुपये खर्च करते, इंदुमिल स्मारकासाठीसुध्दा कोट्यवधी रुपये खर्च करत आहोत. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तितक्याच महत्त्वाच्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उपेक्षित, गरीब, गरजू आणि समाज बांधवांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शिक्षण हे काही लोकांची मक्तेदारी असा समज असताना आज सर्वसामान्यांठी हे महाविद्यालय उभे करुन दिले. आपण स्वत: या कॉलेजचे विद्यार्थी आहोत. पण, आज या महाविद्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनिय अवस्था आहे. सगळी छप्परे अशरक्ष: गळत आहेत. त्यामुळे आज आपण तातडीने येथे भेटीसाठी आलो, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे 9 कोटीचा प्रस्ताव येथील विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. परंतु राज्य सरकारला याचे गांर्भीय नाही, राज्य सरकारला आपल्या आमदारांना 25- 15 च्या प्रस्तावाखाली कोट्यवधी रुपये द्यायला निधी आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाविद्यालयाला सुमारे 9 कोटीचा निधी द्यायला वेळ नाही. सरकारला संवेदना नसल्याची टिका करतानाच दरेकर म्हणाले की, समाज कल्याण विभागाचे सचिव जैन यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली आहे. विरोधी पक्षनेता असलो तरी मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझ्या संवेदना, बांधिलकी महाविद्यालयाशी व डॉ. बाबासाहेबांच्या विचारांशी आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला टोकाची भुमिका घ्यावी लागली तर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी आणि समाज बांधवांना एकत्रित करुन आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

दरेकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हस्के यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयाच्या विकासकामाचा प्रस्ताव शासानाकडे सादर केला असून त्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत, परंतु शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या विषयावर आपण येत्या आठवड्याभरात शासनाकडे बैठक आयोजित करुन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दरेकर म्हणाले. या परिसरात मेट्रोचे काम जोरात सुरु आहे. महाविद्यालयाच्या इमारतीसमोरुन मेट्रो रेल्वे जाणार आहे, त्यांचे काम सुरु असल्यामुळे महाविद्यालाच्या इमारतीचे छप्पर पडत आहे, स्लॅब पडतोय. ज्या ऐतिहासिक वास्‍तु आहेत त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही वास्तु आहे. त्यामुळे या वास्तुचे महात्म्य जपणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.