मुंबई - राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्राकडून आतापर्यंत 55 टक्के लसी राज्याला उपलब्ध झाल्या असून हा लसीकरणाच पहिला टप्पा येत्या तीस दिवसात पूर्ण केला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून येणारा 9 लाख 63 हजारांच्या लसीचा पहिला टप्पा पूर्ण करायचा आहे. सध्या राज्याला काही लसी कमी मिळाल्या असल्या तरी त्याबाबत आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्री अशी चर्चा केली आहे. त्यामुळे उर्वरित लशी येत्या दहा-पंधरा दिवसानंतर पुन्हा मिळतील, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली.
'यांना' घेता येणार नाही लस
राज्यात सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती मंत्री टोपे यांनी दिली. ही लस 18 वर्षे कमी वयाच्या व्यक्तीला, तसेच गरोदर महिला आणि ज्यांना त्वचा अथवा इतर ऍलर्जी आहे, अशा व्यक्तींना दिली जाणार नाही, अशा केंद्राकडून सूचना असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात लागणार 17 लाख 50 हजार लस
राज्याला तब्बल 17 लाख 50 हजार लस लागणार असून प्रत्येक व्यक्तीला दोन डोस हे 30 दिवसांच्या अंतराने द्यायचे आहेत. यासाठी उपसंचालकाच्या कार्यालयात 6 सेंटर उभे करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील स्टोरेजमधून आज (बुधवार) मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, नागपूर येथे हे लस पोहोचतील, असेही टोपे यांनी सांगितले
राज्यात 350 केंद्र
लसीकरणासाठी राज्यात 350 केंद्र उभे करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी 35 हजार लस देण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे लसीकरण करताना कोणतीही घाई करू नये, अशा सूचनाही केंद्राने आम्हाला दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - सोनू सूद सवयीचा अपराधी, बीएमसीचा उच्च न्यायालयात आरोप
हेही वाचा - टेस्ला कंपनीने कर्नाटकची निवड केल्याने मनसेने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा