मुंबई - दादर परिसरातील बाजारपेठेत बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती; परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
पहाटे सातच्या सुमारास दादरच्या आगर बाजारातील दुकानाला आग लागली होती. अग्निशामक दल आणि जेट्टीच्या मदतीने 30 मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही किरकोळ आग असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; परंतु काही दुकाने जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.