ETV Bharat / state

सोने-चांदीच्या दरात घसरण; खरेदीत वाढ - मुंबई चांदी दर न्यूज

जागतिक बाजारात सोन्यासह चांदीची गुंतवणूकदारांकडून विक्री वाढली आहे. त्याचा परिणाम देशातील सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे. सध्या सोने आणि चांदीचे दर घटले आहेत.

gold
सोने
author img

By

Published : Dec 15, 2020, 9:18 AM IST

मुंबई - सोन्याच्या किंमती आज पुन्हा खाली आल्या आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरामध्ये तिसऱ्यांदा घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही काहीशी घट दिसून येत आहे. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने खरेदी वाढली आहे

शुक्रवारी सोन्याचा दर 213 पॉईंटवर बंद झाला. इंट्रा डे दरम्यान सोन्याने 49 हजार 54 रुपयांची पातळी गाठली. याचवर्षी सोन्याने 57 हजार 100 रुपयांची सर्वोच्च पातळीलाही गाठली होती. त्यादरापेक्षा 7 हजार रुपयांनी सोने सध्या स्वस्त आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी सध्या 380 रुपयांच्या घसरणीसह 63 हजार 350 रुपये प्रती किलो आहे.

आयातीत घट -

'अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू होईल, यामुळे रिस्क सेंटीमेंट सुधारल्या आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतेक आशियाई आणि अमेरिकन बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय घट नोंदवली गेली. 9.28 अब्ज डॉलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली. मागील आर्थिक वर्षाच्या तत्सम कालावधीपेक्षा ही आयात 47.42 टक्क्यांनी कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.