गोंदिया - जिल्ह्यात १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक औषधाचे वितरण आजपासून करण्यात आले आहे. या मोहिमेतून एकही बालक वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेवरून या मोहिमेची पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ४७ हजार ७३७ बालकांना जंतनाशक औषध पाजण्याचा उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. आज जंतनाशक औषधे पाजण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये नोडल शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नोडल शिक्षक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील बालकांना ही जंतनाशक औषध पाजणे गरजेचे आहे.