ETV Bharat / state

...आणि राजाबाई टॉवरवरील घड्याळाची टिक टिक झाली पुन्हा सुरू - घड्याळ

मुंबई विद्यापीठातील या ऐतिहासिक घड्याळाला चावी देण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीमुळे चावी देणाऱ्या व्यक्तीला फोर्ट परिसरात येणे अडचणीची झाले होते. यामुळे मागील १७० वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले हे राजाबाई टॉवरवरील ऐतिहासिक घड्याळ बंद पडले होते. पण, विद्यापीठ प्रशासनाने त्या चावी व्यक्तीला बोलावून घेतले आणि सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देत घड्याळ सुरु केले.

राजाबाई टॉवरवरील घड्याळ
राजाबाई टॉवरवरील घड्याळ
author img

By

Published : Apr 10, 2020, 5:38 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या संचारबंदीमुळे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाबाई टॉवरच्या घड्याळाची टिक टिक बंद पडली होती. मात्र, ऐनवेळी येथील सुरक्षा रक्षक विभागाने या घड्याळाला चावी देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि या घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू झाली आहे.

घडाळ्यालाचावी देताना कर्मचारी
घडाळला चावी देताना कर्मचारी
मुंबई विद्यापीठातील या ऐतिहासिक घड्याळाला चावी देण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला देण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीमुळे चावी देणाऱ्या व्यक्तीला फोर्ट परिसरात येणे अडचणीची झाले होते. यामुळे मागील १७० वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले हे राजाबाई टॉवरवरील ऐतिहासिक घड्याळ बंद पडले होते.यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या सर्व यंत्रणा हलवून त्या व्यक्तीला बोलावून घेतले आणि त्याच्याकडून नितेश शिंदे आणि मुख्य सुरक्षा रक्षक एम.जी. कदम या दोघांनी ही चावी कशी द्यायची याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर प्रत्येक दोन दिवसाला ही दोघेजण चावी देण्याची भूमिका बजावत आहेत. यामुळे आता राजाबाई टॉवरवरील ऐतिहासिक घड्याळ पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले असून त्याची टिक टिक सर्व परिसर शांत असल्याने दूरपर्यंत ऐकायला मिळत आहे.फोर्ट परिसरात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टावरमधील हे घड्याळ अत्यंत जुने आहे. या घड्याळाला चावी देण्यासाठी तब्बल २९० पायऱ्या चढून वर जावे लागते. या घड्याळातील बेल ही प्रत्येक पंधरा मिनिटांनी वाजत असते त्यामुळे आजूबाजूचा परिसर या बेलच्या आवाजाने घुमुन जातो.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या घड्याळ आतून प्रत्येक तासागणिक 'गॉड सेव्ह द क्वीन' असे एक संगीत वाजले जायचे. परंतु स्वातंत्र्यानंतर त्यासाठीच्या असलेला गिअर आणि व्हीलला या घड्याळमधून बाजूला काढण्यात आले. अद्यापही या संगीताचे व्हील या टॉवरवर पडून आहेत. आता केवळ पंधरा मिनिटानंतर या घड्याळातील बेलचा आवाज परिसरात घुमत असतो.

हेही वाचा - 'किरीट सोमय्या ही उपद्रवी प्रवृत्तीची व्यक्ती'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.