ETV Bharat / state

'ड्रायव्हरलेस मेट्रो'चे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण - Mumbai Metro news

बंगळुरूतून 23 जानेवारीला निघालेली पहिली स्वदेशी व ड्रायव्हरलेस मेट्रो गुरुवारी (दि. 28 जाने.) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाली आहे.

मेट्रो
मेट्रो
author img

By

Published : Jan 28, 2021, 3:20 PM IST

Updated : Jan 28, 2021, 3:38 PM IST

मुंबई - बंगळुरुतून 23 जानेवारीला निघालेली पहिली स्वदेशी आणि ड्रायव्हरलेस मेट्रो रेल्वे गुरुवारी (दि. 28 जाने.) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाली आहे. ही मेट्रो नक्की कशी आहे याची पहिली झलक मुंबईकरांना उद्या (दि. 29 जाने.) पाहायला मिळणार आहे. उद्या (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेट्रोचे अनावरण होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) जाहीर करण्यात आले आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

बंगळुरुवरून आलेली मेट्रो सध्या चारकोप मेट्रो स्टेशन येथे ठेवण्यात आली आहे. उद्या (दि. 29 जाने.) दुपारी 3 वाजता या मेट्रोचे अनावरण मुख्यमंत्र्याच्या हस्ते होईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे.

फेब्रुवारीत 'ट्रायल रन'

ज्या मेट्रो गाडीचे उद्या अनावरण होणार आहे ती मेट्रो गाडी मेट्रो 2 अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर ते अंधेरी) या मार्गावर धावणार आहे. मुळात डिसेंबर 2020 मध्येच हे दोन्ही मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार होते. पण, कोरोनामुळे तब्बल सहा महिने सेवा पुढे ढकलली गेली. त्यानुसार आता मे, 2021 मध्ये हे मार्ग सुरू होणार आहेत. तर यासाठी फेब्रुवारीमध्ये ट्रायल रन होणार आहे.

हेही वाचा - सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या पत्नीला ईडीचे समन्स

Last Updated : Jan 28, 2021, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.