ETV Bharat / state

बीकेसी कोविड सेंटरचे वादळामुळे कोणतेही नुकसान नाही उगाच राजकरण करू नका - महापौर

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बीकेसी जम्बो कोविड सेंटरला बसला नाही. विरोधकांनी महामारी व वादळाच्या काळात उगाच राजकारण करू नये, असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेक यांनी सांगितले.

पाहणी करताना
पाहणी करताना
author img

By

Published : May 18, 2021, 5:48 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका बीकेसी जम्बो कोविड सेंटरला बसल्याच्या बातम्या कालपासून झळकत आहेत. तर विरोधकांनीही या सेंटरचे खूप मोठे नुकसान झाल्याचा प्रचार सुरू केला आहे. पण, प्रत्यक्षात मात्र बीकेसी कोविड सेंटरचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मी आताच सेंटरची पाहणी केली. तेव्हा खोट्या, चुकीच्या गोष्टी मांडून चांगल्या डॉक्टरांचे, अधिकाऱ्यांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण विरोधकानी करू नये, अशा बाबतीत तरी राजकारण करू नये, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकावर निशाणा साधला आहे. तर वादळाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत इतत्र हलवण्यासह सेंटरचे नुकसान होऊ नये म्हणून सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आणि पथकाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाचे कौतुकही यावेळी महापौरांनी केले.

182 रुग्ण सुरक्षितपणे स्थलांतरीत

तौक्ते वादळाचा इशारा मिळाल्याबरोबर पालिकेने बीकेसी कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. डेरे आणि त्यांच्या पथकाने सर्व नियोजन करत रविवारीच (दि.16मे) 182 रुग्णांना सेव्हन हिल्स, सायन आणि इतर रुग्णालयात सुरक्षितरित्या हलवले. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. त्याचवेळी सेंटरला वादळाचा आणि पावसाचा मोठा फटका बसू नये यासाठी ही ज्या काही उपाययोजना करता येतील त्याही त्यांनी केल्या. लसीकरण केंद्राबाहेरील मंडप आणि त्यातील सामान काढून ठेवले. एकूणच चांगले काम वादळादरम्यान डॉ. डेरे आणि पथकाने केले, अशा शब्दांत महापौरांनी कौतुक केले.

डॉक्टर अन् अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करू नका

सोमवारी (दि. 17 मे) वादळाचा मोठा फटका मुंबईला बसत असताना बीकेसी कोविड सेंटरचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. विरोधक ही हा मुद्दा उचलून धरत होते. तेव्हा आजच्या भेटीत महापौरांनी या सगळ्या बाबींचा खरपूस समाचार घेतला. बीकेसी कोविड सेंटरच्या कंपाऊडचे काही पत्रे पडले आहेत. हे सोडले तर कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. असे असताना बीकेसी कोविड सेंटरबाबत खोटी, चुकीची माहिती पसरवण्यात आली असे त्या म्हणाल्या. तर विरोधकांनी महामारी आणि वादळासारख्या नैसर्गिक संकटात तरी राजकारण करू नये. जे डॉक्टर-अधिकारी जीवाची बाजी लावत काम करत आहेत त्यांचे खच्चीकरण करू नये, असे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. दरम्यान, काल (दि. 17 मे) जे लसीकरण केंद्राचा मंडप उडून गेले आणि केंद्राचे नुकसान झाल्याचे वृत्त दाखवण्यात येत होते तेही चुकीचे आहे. कारण खबरदारी म्हणून सेंटरकडून रविवारीच मंडप काढण्यात आला होता. तर सर्व सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मान्सून ठरलेल्या तारखेलाच केरळमध्ये दाखल होणार; हवामान विभागाची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.