ETV Bharat / state

विमानतळाची मालकी अदानी समुहाकडे, मात्र नाव बदलण्याचे अधिकार नाही - मंत्री नवाब मलिक

अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट, असे नामफलक लावल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या भावना दुखावल्यामुळेच नाम फलक तोडण्याची घटना घडल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

author img

By

Published : Aug 2, 2021, 7:13 PM IST

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत. याचा अर्थ असा नाही की, अदानी समूहाला विमानतळाचे नाव बदलण्याचे अधिकार मिळाले. 'अदानी एअरपोर्ट' हे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात लावणे हे अदानी समूहाची चूक आहे, असे खडे बोल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुनावले आहेत.

बोलताना मंत्री मलिक

सोमवारी (दि. 2 ऑगस्ट) मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नाव बदलण्याच्या मुद्द्यावर अदानी समूहावर टीका केली.

लोकभावना दुखावल्याने तोडफोडीची घटना

अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट, असे नामफलक लावल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या भावना दुखावल्यामुळेच नाम फलक तोडण्याची घटना घडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. अदानी समूहाकडे मालकीहक्क जाण्यापूर्वी जीव्हीके या कंपनीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी हक्क होते. जीव्हीके कंपनीचे भाग अदानी समूहाने खरेदी केल्यानंतर मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी हक्क आणि समूहाकडे आले आहेत. मात्र, आदानी समूहाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव बदलण्याचे अधिकार मिळाली नसल्याचे नवाब मलिकांनी सांगितले. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मान्यतेनुसार मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

एमपीएससीच्या तीन सदस्यांची नावे नियुक्तीसाठी राज्यपालांकडे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत येणारी पदे भरण्याचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तीन सदस्यांची पदे अजूनही रिक्त आहे. या पदांसाठी अर्ज मागवण्यात आली होती. यापैकी तीन सदस्यांची नावे राज्य सरकारकडून निश्‍चित करण्यात आली असून नियुक्तीसाठी ती नावे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. राज्यपाल यांनी एमपीएससीच्या नियुक्तीसंदर्भात लवकरात लवकर मान्यता दिल्यास ही पद भरण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातही "खेला होबे"

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा झटका दिला. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान बंगालीमध्ये "खेला होबे" म्हणजे खेळ होईल, असे त्या म्हणाल्या होत्या. आता उत्तर प्रदेश, गुजरातसह इतर राज्यांमध्येही ज्या निवडणुका होणार आहेत. त्या राज्यातही "खेला होबे" नक्की होईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. देशातील जनता महागाईला कंटाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फटका केंद्र सरकारला नक्की बसेल, असेही यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.