मुंबई: घरी जाणे येणे असलेल्या एका दोन मुलांचा आई असलेल्या 52 वर्षिय महिलेला 62 वर्षिय व्यक्तीने लिव्ह इन मधे राहण्यासाठी तगादा लावला. तीने या गोष्टीला विरोध केल्यामुळे तीच्यावर सिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हत्त्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महेश पुजारी 62 असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिला दोन मुलांसोबत राहते तिला 24 आणि 26 वर्षांची मुले आहेत.
ती महिला सुमारे पंचवीस वर्षांपासून पतीपासून विभक्त राहते. आरोपी महेश पुजारी याचे तीच्या घरी जाणे येणे होते. पुजारीचेही पहिले लग्न झालेले आहे. तरी तो या महिलेसोबत राहायचा मुले मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या महिलेने पुजारी सोबत राहण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे तीने त्याला पहिल्या पत्नीकडे जा असा सल्ला वारंवार दिला. यावरुन दोघांमधे कायम वादही व्हायचा. याच रागातून त्याने महिला सकाळी साडेपाच वाजता पाणी भरण्यासाठी खाली येताच अॅसिड हल्ला केला आणि तो घटनास्थळावरुन पळून गेला. महिला या हल्ल्यात 50 टक्के भाजली आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी ए टी व्ही भारतशी बोलताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिस पथकाने लगेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. प्राप्त माहितीनुसार, दोघेही 25 वर्षांपासून एकत्र राहत होते. महेश पुजारीला दारुचे व्यसन आहे. त्याच्या सवयीमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे.
या हल्या प्रकरणी अटक करण्यात अलेला आरोपी महेश पुजारी हा कफ परेड भागात राहतो. त्यांचे लग्न झालेले असून त्याला देखील दोन मुले आहेत. मात्र तो पहिली पत्नी असताना देखील पतीला सोडून विभक्त राहणाऱ्या महिलेकडे यायचा. तीच्या सोबत रहायचा तीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी वारंवार तगादा लावायचा. पीडित महिलेने मुले मोठी झाली आहेत हे कारण सांगत त्याला लिव्ह इन मध्ये राहण्यास नकार दिला. तसेच त्याला पत्नीकडे जायला सांगितल्यामुळे संतापलेल्या महेश पुजारीने पाळत ठेवून तिच्यावर अॅसिड फेकून पळ काढला. हल्ला झाल्यावर महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आले. तेव्हा तीची प्रकृर्ती गंभीर होती सध्या तीची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.