ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

Thackeray Vs Shinde Group Clash: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी सातच्या सुमारास बाळासाहेबांच्या स्मारकात दाखल झाले. त्यानंतर शिवसेनेच्या दोन गटात शिवाजी पार्कवर जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालंय.

Balasaheb Thackeray Smritisthal Shivaji Park

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 11:06 PM IST

Updated : Nov 17, 2023, 6:24 AM IST

ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात राडा

मुंबई : मुंब्रातील शिवसेना शाखेचा वाद ताजा असताना गुरुवारी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला शिवसेना (शिंदे गट) तसंच शिवसेना (ठाकरे गटाचे) कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करत एकामेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. मात्र, अचानक उडालेल्या गोंधळामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना देखील घडली आहे.

दोन्ही गट आमने-सामने : बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री साडेआठ वाजता शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केलं. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिंदे गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई, अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिवतीर्थ दाखल झाले. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील स्मृतीस्थळावर हजर होते. त्यामुळं ठाकरे गटानं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. अचानक दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा गदारोळ झाला.

उद्या बाळासाहेबांचा स्मृतीदिन : शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांच्या स्मृती दिनाचा महत्त्वाचा दिवस आहे. मराठी माणूस, महाराष्ट्र तसंच देशासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. त्यांना आम्ही शांततेनं श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व माहिती आहे. ज्यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत, ते कुणीही इथं अनर्थ करणार नाहीत, असं देसाई म्हणाले.

महिलांना धक्का बुक्की : बाळासाहेबांचे विचार सोडून महिलांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार येथे घडला आहे. ही जागा कोणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत शिंदे गटानं म्हटलंय. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची ज्योत सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांच्या दलालांकडून ती भिजवण्याचा प्रयत्न होतो, अशी टीका आमदार सदा सरवणकर यांनी केली. स्मृतीस्थळाचे पावित्र्य यांनी घालवलं असून लाज वाटत असल्याचं शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय.

हा प्रकार अतिशय निंदनीय : झालेल्या दोन्ही गटातील राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस्थळी हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध करत नाराजी व्यक्त केली. उद्या बाळासाहेबांचा स्मृतिदिन शांततेत पार पडावा यासाठी आम्ही आजच गेलो होतो. परंतु, आम्ही आल्यानंतर तिथं जाऊन शुद्धीकरण करण्याची काही गरज नव्हती. यामुळं आमचे कार्यकर्ते तिथं होते. त्यांच्या शुद्धीकरणामुळं भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं दोन्ही गटात घोषणाबाजी झाली. त्याचे नंतर रूपांतर धक्काबुक्की झालं. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा -

  1. मुंबई महापालिका रेल्वे स्वच्छतागृहांची स्वच्छता करणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
  2. भाजपानं टूर अँड ट्रॅव्हल्स असं नविन खातं उघडलं असावं, राज ठाकरेंचा अमित शाह यांना टोला
  3. मतदारांनी नाकारलं तर उद्या ते त्यांच्या विरोधातही बोलतील, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Nov 17, 2023, 6:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.