ETV Bharat / state

Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी राजीनामा का दिला? सामनामधून ठाकरे गटाने उपस्थित केले दोन प्रश्न - शरद पवारांनी राजीनामा का दिला

शरद पवारांनी जेवढी खळबळ उडवून दिली आहे, त्यापेक्षा जास्त खळबळ त्यांच्या राजीनाम्याने उडविली आहे. कोणी किती पाण्यात आहे, एकप्रकारे शरद पवारांनी दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतरही आपणच खरे नायक आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यासाठी सामनाने शरद पवारांना भीष्माची उपमा दिली आहे. ज्या प्रमाणे भीष्म शरपंजरी पडले होते, तशी अवस्था असूनही आपण राजकारणातले भीष्म आहोत, हे दाखवून दिल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

सामना संपादकीय
Sharad Pawar Resignation Saamana
author img

By

Published : May 4, 2023, 11:19 AM IST

मुंबई - 2023 या नवीन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली सर्वात मोठी घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आहे. काहीजण हे शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा असा आग्रह करत होते. तर काहीजण शरद पवार यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे अशा मताचे होते. राष्ट्रवादीतील या सध्याच्या परिस्थितीवर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून भाष्य करण्यात आले आहे. दैनिक सामनामध्ये 'शरद पवार काय म्हणणार?' अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

अचानक राजीनामा दिला नाही-सामनाने शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचे दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला नाही, असे मत अग्रलेखात व्यक्त केले आहे आहे. भावनिक व राजीनाम्याचा मुसदा आणला होता व त्यानुसार केले असे सामनाने म्हटले आहे. जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना या खऱ्या अर्थाने राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. तुम्हीच नसाल तर पक्षात का राहायचे असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.

शरद पवारांच्या राजीनाम्यामागे दोन शक्यता-अनेकांचा पाय भाजपात आहे, असा पक्ष तुटलेला पाहण्यापेक्षा राजीनामा द्यावा, असा शरद पवारांच्या मनात विचार आला असावा, असे मत अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या उंबरठ्याजवळ पोहोचला होता. राज्याच्या राजकारणात कधीही भूकंप घडू शकतो, असे वाटत असतानाच त्यांनीच भूकंप घडवून आणला. पवारांनी ६० वर्षांहून अधिक राजकारण केले. त्यामुळे अनेकांचे राजकारण बिघडले. राजकारणाचा मोह धर्मराज व कृष्णाला सुटला नाही. फकीर म्हणवून घेणारे मोदींनाही मोहमायेने जखडून ठवेले आहे. पण, पवारांनी राजीनामा अचानक देऊन का खळबळ उडविली असावा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अजित पवार व त्यांचा गट हा भाजपच्या जवळ गेल्याने राजीनामा दिला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरी शक्यता म्हणजे ईडीच्या कारवायामुळे पक्षातील सहकाऱ्यामध्ये अस्वस्थता अशी आहे.

हेही वाचा-Sanjay Raut Appeared In Court : कर्नाटक निवडणुकीत धडाडणार खासदार संजय राऊतांची तोफ, बेळगावात घेणार सभा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.