मुंबई : प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस आणि मॉडेल रिया पिल्लई ( Leander Paes and Rhea Pillai ) 2005 पासून लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होते. तीन वर्षाच्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर प्रेयसी मॉडल रिया पिल्लई यांनी कौटुंबिक हिंसाचार न्यायालयात याचिका दाखल केली ( Leander Pace Rhea Pillai Divorce ) होती. या याचीकेवर महानगर दंडअधिकारी न्यायालयाने निर्णय देत मॉडल प्रेयसीला महिन्याला 1 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले होते. या विरोधात लिअँडर पेस यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता ( Leander Paes Petition in Bombay Sessions Court ) आहे.
कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष : लिएंडर पेसने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत रिया पिल्लईसोबत लग्न केल्याचे नाकारले आहे. ज्यावेळी मुलीचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्यातील नाते संपुष्टात आल्याचेही पेसने याचिकेत म्हटले आहे. याशिवाय कोर्टात याचिका दाखल करण्यास उशिर झाल्याचे सांगत पिल्लईने माझे घर सोडण्यास नकार दिल्याचाही आरोप पेसने याचिकेत केला आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असून आता कोर्ट या वादात काय निकाल देणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.
संजय दत्तशी विवाह करून घटस्फोट : मॉडेल रिया व पेस यांच्यात प्रेमसंबंध असल्याने ते 2005 साली लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांना 2006 साली मुलगी झाली. दोघांनी काडीमोड घेतल्यानंतर 2008 साली रियाने अभिनेता संजय दत्त याच्याशी विवाह केला. नंतर त्यांचाही घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर रियाला 20 कोटी रुपयांहून अधिक जास्त किमतीच्या दोन सदनिका मिळाल्या होत्या.
दंडाधिकारी न्यायालयात धाव : दरम्यान 2014 साली रिया हिने कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली व 2008 साली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना पेसने तिची भावनिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. दंडाधिकारी न्यायालयाने याची दखल घेत पेसला 1 लाख रुपये व याव्यतिरिक्त रियाने वांद्रे येथील कार्टर रोडची सदनिका दोन महिन्यांत सोडावी या अटीवर 50 हजार रुपये देण्याचे आदेश पेसला दिले होते.