मुंबई - मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने पुढील आदेशापर्यंत फरार हिरा व्यापारी नीरव मोदी याची बहिण आणि मेहुण्याविरूद्ध जारी वॉरंट नाकारला आहे.
मागील सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यांमध्ये नीरवची छोटी बहिण आणि मेव्हण्याने नीरवविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात या दोघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला असून तो कोर्टाकडून मंजुरही करण्यात आला आहे.
नीरवची बहिण पूर्वी मेहता आणि त्याचे पती मयंक मेहता यांनी कोर्टात समोर एक अर्ज सादर केला होता. या अर्जात त्यांनी म्हटले होते की, त्यांना नीरव मोदीपासून दूर रहायचे आहे. तसेच त्याच्या आणि त्यांच्या व्यवहारांशी संबंधित काही महत्वाचे आणि पक्के पुरावे देऊ शकतो. दरम्यान, पूर्वी हिच्याकडे बेल्जिअमची नागरिकता असून पूर्वीचे पती मयंक हे ब्रिटीश नागरिक आहेत.
दोघांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले की, 'नीरव मोदीच्या कथीत गुन्हेगारी कृत्यांमुळे त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आम्ही ईडीशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या दोन प्रकरणांध्ये साक्षीदार बनू इच्छितो. त्याचबरोबर असे काही खुलासे करु शकतो जे नीरव आणि इतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यात महत्वाचे ठरु शकतात.'
कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेले प्रतिबंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर लागलेल्या बंदीमुळे भारतात येऊ शकलो नाही. पण आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोरही आपला जबाब देऊ शकतो, असे देखील दोघांनी म्हटलं आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये देखील ईडीला दिलेल्या जबाबात दोघांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
हेही वाचा - नवी नियमावली : होम क्वारंटाईनमध्येही मास्क, ग्लोज घालणे बंधनकारक
हेही वाचा - महाराष्ट्रात उच्चांकी लसीकरण, ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस