ETV Bharat / state

उघडले देवाचे दार : राज्यातील मंदिरातील परिस्थिती काय?

author img

By

Published : Nov 18, 2020, 6:29 PM IST

Updated : Nov 18, 2020, 8:34 PM IST

अखेर आठ महिन्यांनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. यानुसार दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर 16 नोव्हेंबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू झाली आहेत. पाहूयात, मागील 3 दिवसांत राज्यातील प्रार्थनास्थळांमध्ये काय परिस्थिती आहे? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

CORONA AND TEMPLES
कोरोना आणि मंदिरं

अखेर आठ महिन्यांनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. यानुसार दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर 16 नोव्हेंबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू झाली आहेत. पाहूयात, मागील 3 दिवसांत राज्यातील प्रार्थनास्थळांमध्ये काय परिस्थिती आहे? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

  • मुंबई - राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पाडव्यापासून खुली करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यानुसार मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर देखील सुरू करण्यात आलेले आहे. मागील तीन दिवसांपासून मंदिरात कोरोनासंबंधीचे नियम पाळून भाविक शांततेत दर्शन घेत आहेत. सिद्धिविनायक मंदिर खुले झाल्यापासून आजचा तिसरा दिवस आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत हे मंदिर सुरू करण्यात आले आहे. मंदिराबाहेर क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. ते घेऊनच आतमध्ये प्रवेश मिळत आहे. तसेच सर्व मंदिर परिसर सॅनिटाईझ केले जात आहे. एका तासाला १०० भाविकांना प्रवेश मिळत आहे. तर दिवसाला 1000 भाविकांना दर्शन देण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेत फिजिकल डिस्टन्सिंगने पालन करत भाविकांना बाप्पाचे लांबून दर्शन दिले जात आहे. हळूहळू भाविकांचा प्रतिसाद पाहता दर्शनासाठी भाविकांची संख्या देखील वाढवणार, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
  • पुणे - पाडाव्यापासून मंदिरे खुली होत असताना पहिल्याच दिवशी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती आणि गेले तीन दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून येत असल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनपूर्वी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीइतकी गर्दी जरी आता जाणवत नसली तरी भाविक लक्षणीयरित्या मंदिरात येत असल्याचे याठिकाणी दिसून आले. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे या ठिकाणी काटेकोर पालन होत असल्याचे दिसून आले. अगदी रांगेपासून ते बाप्पाचं दर्शन घेण्यापर्यंत प्रत्येक काळजी घेतली जात आहे. दर्शन रांगेत सहा फुटांच्या अंतरावर मार्क केले असून सुरक्षित अंतर रहावे म्हणून प्रत्येकाला मार्किंग केलेल्या ठिकाणी थांबवून पुढे सोडले जाते. मंदिरात हार, फुले, नारळ बाप्पाला अर्पण करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून नियमांची कडेकोट अंमलबजावणी केली जात आहे. मंदिर प्रशासनाने तीन टप्प्यात मंदिर अनलॉक करण्याचे ठरवले असून पहिल्या टप्प्यात फक्त भाविकांना मंदिरात प्रवेश आणि दर्शन, दुसऱ्या टप्प्यात फुलं, हार, नारळ, प्रसाद यांना परवानगी दिली जाणार तर तिसऱ्या टप्प्यात मंदिरात भाविकांना बसू दिले जाणार तसेच होम, यज्ञ, पूजा याला परवानगी दिली जाणार आहे.
  • औरंगाबाद - जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये भक्तांनी संयम पाळल्याचे पाहायला मिळाले. घृष्णेश्वर मंदिर किंवा खडकेश्वर मंदिर या मंदिरांमध्ये नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येत आहे. तर 12 व्या ज्योतिर्लिंग मंदिराकडे भक्तांनी पाठ दाखवल्याचे चित्र आहे. या मंदिरात रोज सरासरी पाच हजारांच्या जवळपास भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र, भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवण्याची पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांमध्ये घृष्णेश्वर मंदिरात एक ते दीड हजार भाविकांनी दर्शन घेतलं. मुख्य गाभारा बंद असल्याने मंदिराच्या आत मध्ये भाविकांना प्रवेश दिला जात नाही. शहरातील मंदिरे सकाळी सात वाजेपासून ते रात्री नऊपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर विश्वस्तांनी नियमांचे पालन करुनच दर्शन घेता येईल, अशी भूमिका घेतली आहे.

मशिदीतही नियमांचे पालन - शहरातील मशिदीतही मुस्लिम बांधवांना नमाज पठण करत असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मशिद प्रमुखांनी केले आहे. ज्यामध्ये मास्क घालून नमाज पठण करणे, दहा वर्षांखालील मुलांना आणि साठ वर्षांपुढील वृद्धांना मशिदीत प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. त्यांनी घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • उस्मानाबाद - वेगवेगळ्या नियमावर बोट ठेऊन तुळजाभवानीचे मंदिरही सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे सेलिब्रिटी आणि व्हीआयपी यांच्यासह सामान्य भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंदिर उघडताच परिसरामध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. दररोज फक्त 4 हजार भाविकांना दर्शन घेण्याची मर्यादा सकाळी सकाळीच संपत आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक होत आहे. तर दुसरीकडे व्हीआयपी लोक दर्शनासाठी हजेरी लावत असून आमदार आशुतोष काळे आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब व्हीआयपी कोट्यातून देवीचं दर्शन घेतले. लहान मुलांना दर्शनासाठी मनाई असतानाही राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आपल्या १० वर्षाखालील मुलाला घेऊन तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तर अभिनेत्री नेहा पेंडसेने पोलीस बंदोबस्तात देवीचे दर्शन घेतले. दर्शन पास काऊंटर बंद असतानाही या मंडळींना प्रशासनाने देवीचे दर्शन घडवून दिल्याने सामान्य भाविक आणि व्हीआयपी भाविक यात प्रशासनाने दूजाभाव केल्याचे पाहायला मिळते आहे.
  • नांदेड - कोरोना महामारी आणि लॉकडाऊनपूर्वी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये दररोज 20 ते 25 हजार भाविक देश-विदेशातून येत असत. सद्यस्थितीत दररोज सात ते आठ हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. सध्या दिल्ली आणि पंजाब येथून विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच रेल्वेसेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात इतर राज्यातील व जिल्ह्यातील भाविक येत आहेत. साधारणतः तीन हजारच्या आसपास बाहेरचे तर परिसरातील चार ते पाच हजार भाविक येत असून एकंदरीत सात ते आठ हजार भाविक दर्शन घेत आहेत. 16 नोव्हेंबरपासून धार्मिकस्थळे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. तोंडाला मास्क लावणे तसेच सॅनिटायझरचा वापर आदी बाबतीत सूचना देण्यात येत आहेत. तसेच गुरुद्वारात भाविकांना जेवणासाठी लंगर व्यवस्थाही सुरू आहे, अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांनी दिली आहे.
  • शिर्डी (अहमदनगर) - 16 नोव्हेंबरच्या पहाटेच्या काकड आरतीने शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. 18 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 24 हजार 700 भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. आल्यावर सर्वात प्रथम भाविकांना सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आणि पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तत्‍काळक उपचारासाठी साई संस्थानच्या कोविड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येत आहे. मंदिरात दररोज 8 हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जात आहे. 10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया आणि 65 वर्षावरील व्‍यक्‍तींना तसेच मास्‍क न वापरणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली. साईबाबांच्या दर्शनासाठी ऑनलाइन पद्धतीने भाविक पास बुकिंग करून येत आहे. तसेच जे काहींना इथे आल्यानंतर ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करून दर्शन दिल्या जात आहे. संस्‍थानचे साईआश्रम 1 साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (500 रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास काऊंटर वरुन भाविकांना साई दर्शन पास दिले जात आहे. साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या आरतीसाठी प्रत्‍येक आरतीकरिता एकूण 60 साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येत आहे.
  • रत्नागिरी - जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिर सोमवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. मंदिर प्रशासनाकडून राज्य सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन होताना दिसत आहे. तीन दिवसांत 12 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. भाविकही मंदिर परिसरात नियमांचे पालन करत आहेत. मात्र, बाहेर पडल्यानंतर खरेदी असेल किंवा समुद्रावर फिरणे असेल याठिकाणी भाविक, पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन होत असलेलं पहायला मिळत आहे. भाविकांनी मंदिरात येताना गर्दी करू नये, यासाठी दर्शन रांगेत 5 फुटाचे अंतर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी भाविकांना उभं राहण्यासाठी बॉक्स आखण्यात आले आहेत. प्रत्येकाचे तापमान तपासले जाते. व्हिआयपी दर्शनही बंद करण्यात आले आहे. भाविकांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत दर्शन दिले जात आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मंदिर बंद करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करून मंदिर पुन्हा दर्शनासाठी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरू राहते. मंदिरात येताना दुर्वा, फुले आदी ओले, साहित्य न आणता नारळ, सुका मेवा हा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक बंद आहे.

Last Updated : Nov 18, 2020, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.