ETV Bharat / state

आहेत शिक्षक मात्र काम करतात जिकरीचे; कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मोफत रिक्षा सेवा - घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांना मोफत रिक्षा सेवा

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दत्तात्रय सावंत हे मागील काही दिवसांपासून ईशान्य मुंबईत कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर अशी सेवा देत आहेत. सावंत यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 29, 2021, 7:19 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वाढलेल्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबरोबरच मुंबईतील गल्ली-बोळामध्ये रुग्णवाहिका लवकर पोहोचणे कठीण असते, अशा रुग्णांच्या सेवेत पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत धावून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य रुग्णालय ते घरपोच अशी रिक्षा सेवा देत आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मोफत रिक्षा सेवा देणारे शिक्षक

रिक्षाचालक दत्तात्रय सावंत हे घाटकोपरमध्ये राहतात. ज्ञानसागर विद्या मंदिर शाळेत ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दत्तात्रय सावंत हे मागील काही दिवसांपासून ईशान्य मुंबईत कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर अशी सेवा देत आहेत. सावंत यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सावंत यांनी आतापर्यंत 26 कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत प्रवास दिला आहे.

हेही वाचा - सांगलीत चाळीस लाखाच्या आलिशान गाडीतून 40 रुपये किलो वांग्याची विक्री...!

मी कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत कोविड केंद्र, रुग्णालयापर्यंत सोडतो आणि तसेच रुग्णालय, कोरोना केंद्रातून डिस्चार्ज झालेले रुग्ण घरी सोडून येतो. यासाठी मी स्वतः सुरक्षेचे सगळे उपाय पाळतो. सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाहीत, यात अनेकांचे वेळेत उपचार न झाल्याने जीव देखील जात आहेत. अशा स्थितीत गोरगरीब रुग्णांना वेळेत सरकारी मदत मिळेल की नाही, खासगी रुग्णवाहिका परवडत नाही आणि अनेकदा सार्वजनिक वाहने कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देत नाहीत. अशावेळी माझी मोफत सेवा त्यांच्या कमी येईल, असे सावंत सांगतात. तसेच ही सेवा जोपर्यंत कोरोनाची लाट ओसरत नाही, तोपर्यंत सुरू राहील असेही त्यांनी सांगितले. या कठीण काळातही आपली समाजाप्रतीची बांधिलकी सावंत हे जपताना दिसत आहेत. त्यांचा आदर्श समाजाने घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.