ETV Bharat / state

Mumbai Police : महिला टॅक्सीत विसरली साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने पर्स.. चालकाचा शोध घेत पोलिसांनी शोधून दिली पर्स

मुंबई पोलिसांची कौतूकास्पद कामगिरी पुन्हा समोर आली आहे. सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची टॅक्सीत विसरलेली पर्स पोलिसांनी परत मिळवून दिले आहे. सोने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज त्यात होता. महिलेने दादर पोलिसांचे आभार मानले आहेत.

Teacher got back her purse
शिक्षिका दागिन्याची पर्स टॅक्सीत विसरली
author img

By

Published : Jan 29, 2023, 1:46 PM IST

मुंबई : भाईंदरयेथून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या महिलेची पर्स पोलिसांनी मिळून दिली. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी महिलेने टॅक्सी केली होती. गडबडीत सोन्याचे दागिने असलेली पर्स महिला टॅक्सीत विसरली. त्यानंतर महिलेने दादर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी तत्परतेने टॅक्सी नंबर मिळवून टॅक्सी चालकाचा शोध घेतला. साडेपाच लाखांचा ऐवज असलेली पर्स शिक्षिका महिलेला दादर पोलिसांनी परत मिळवून दिली.

पर्समध्ये लाखोंचा मुद्देमाल : दादर पोलिसांनी टॅक्सीमध्ये विसलेल्या पर्समधील सोने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल तात्काळ शोध घेऊन परत मिळवून दिल्यानंतर दादर पोलिसांच्या तत्परतेबद्दल कौतूक केले जात आहे. निखिला विठ्ठल कारवा ( 43 वर्ष) या भाईंदर पश्चिम येथे राहतात. निखिला या शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशन येथून सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स त्या टॅक्सीमध्ये विसरल्या. या पर्समध्ये दोन डायमंडच्या बांगड्या किंमत 2 लाख रुपये, चार सोन्याच्या बांगड्या किंमत 2 लाख रुपये, एक सोन्याची अंगठी, किंमत 50 हजार आणि 1 लाख रुपये, असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल होता.

दादर पोलिसांच्या तत्परचे कौतूक : टॅक्सीत पर्स विसरल्याची तक्रार महिलेने दादर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्हा कलम 403 अन्वये दादर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. त्यानंतर दादर पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवली आणि पोलिसांनी तत्परता दाखवली. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक मंदिर चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकड, दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पायगन, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस हवालदार मनोज सुतार, दया शिंदे, मच्छिंद्र पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबीचा तात्काळ तपास करून टॅक्सीचा शोध घेतला आणि विसरलेली पर्स शोधून काढली. या पर्समधील साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार निखिला कारवा यांना सुस्थितीत दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या हस्ते परत देण्यात आला. या शिक्षिका असलेल्या महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच दादर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परचे देखील त्यांनी कौतूक केले आहे.

हेही वाचा : Amravati Graduate Constituency : मला मिळणारे समर्थन पाहून विरोधकांकडून खोटी ऑडिओ क्लिप व्हयरल - धिरज लिंगाडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.