मुंबई : कपडे शिवण्यावरून (Taylor Stabbed Scissors ) झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसन झाले आहे. टेलरने रागाच्या भरात २२ वर्षीय तरुणाच्या पोटात कात्री खुपसली (Taylor stabbed scissors to colleague) आहे. धारावी परिसरात हा प्रकार घडला असून जखमी तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना किडनी निकामी होऊन शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू (Death of injured youth) झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल (murder case registered) करण्यात आला आहे.
कामावरून वादंग आणि हत्या : संगम गल्ली येथे चांद आलम शेख यांचा महिलांच्या कपड्याचे शिवणकाम करण्याचा कारखाना आहे. अटक आरोपी बद्दिन खान (२२) हा या ठिकाणी काम करायचा. तर त्याने शिवलेल्या कपड्यांचे धागे तोडण्याचे काम मृत व्यक्ती नकिब अब्दुल सत्तार (२२) ही करत असे. २ डिसेंबर रोजी सकाळी बद्रुद्दिन आणि नकीब यांच्यात कामावरून वादंग निर्माण झाला. त्यानंतर वादाचे पर्यवसन हत्येत झाले.
कात्री नाकिबच्या पोटात खुपसली : बदुद्दिन हा कपडे शिवण्यात टंगळमंगळ करतो, असा आरोप नाकिबने केला. त्यावरून त्यांच्यात जोरदार भांडण सुरु झाले आणि रागाच्या भरात बद्रुद्दीनने कपडे कापण्याची पितळेची कात्री नाकिबच्या पोटात खुपसली. पीडितचा भाऊ तैकिर आलम यांच्या तक्रारीवरून धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बद्रुद्दीनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी आम्ही हल्लेखोरावर हत्येचे कलम वाढवले आहे. त्याच्याविरोधात आधी दाखल झालेल्या गुन्ह्यात आयपीसी कलम ३०७ आणि ५०४ लावण्यात आले. या गुन्ह्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती अशी माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली आहे.