मुंबई - मुंबईतील टॅक्सी-रिक्षाचे भाडे वाढ करण्यात आलेली आहे. सुधारित भाडेवाढीनुसार टॅक्सी-रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशनसाठी ३१ मे २०२१ पर्यंत मुदत परिवहन विभागाने देण्यात आली होती. मात्र, ही मुदत सोमवारी संपली आहे. मात्र, आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने टॅक्सी-रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशनसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तीन महिन्याची मुदत वाढ
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होतो. त्यानंतर नव्या भाडेवाढीकरिता ऑटोरिक्षा-टॅक्सीचे मिटर रिकॅलिब्रेशन करण्याकरिता 31 मे 2021 पर्यंत मुदत परिवहन विभागाकडून देण्यात आली होती. तसेच मीटर अद्ययावत होईपर्यंत प्रवाशांकडून अद्ययावत भाडे आकारण्यासाठी परिवहन विभागाने नव्या भाडेदराचा तक्ताही देण्यात आलेला होता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे रिक्षा-टॅक्सीचे मीटरचे रिकॅलिब्रेशनचे कामकाज बंद करण्यात आले होते. सध्या आता राज्यात लॉकडाऊन पुन्हा 15 जूनपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता परिवहन विभागाने रिक्षा टॅक्सी मीटरचे रिकॅलिब्रेशनची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बैठकीत झाला निर्णय
रिक्षा टॅक्सीचे मीटरचे रिकॅलिब्रेशनचची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावाला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मजुरी दिली आहे. तसेच या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ब्रेक द चेन अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सदस्यांनी सर्वकष विचार करून रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ आणि मीटर अद्ययावत होईपर्यंत प्रवाशांकडून अद्ययावत भाडे कागदी तक्तानुसार आकारण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.