ETV Bharat / state

टॅक्सी चालकांना 2 प्रवासी नेण्यास परवानगी द्यावी, मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी - taxi drivers news

टॅक्सी चालकांचा विचार करून त्यांना अत्यावश्यक सेवेतील किमान 2 प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन आयुक्तांकडे केली आहे.

Taxi drivers should be allowed to carry 2 passengers,  Demand for Taxi Men's Union in mumbai
टॅक्सी चालकांना 2 प्रवासी नेण्यास परवानगी द्यावी, मुंबई टॅक्सी मेन्स युनियनची मागणी
author img

By

Published : Jul 9, 2020, 5:40 PM IST

मुंबई - राज्य शासनाने मिशिन बिगीन अगेन-2 अंतर्गत अनेक सेवांमध्ये सवलती दिल्या आहेत. त्याचबरोबर टॅक्सी चालकांचा विचार करून त्यांना अत्यावश्यक सेवेतील किमान 2 प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन आयुक्तांकडे केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर ओला उबेरसारख्या खासगी टॅक्सीचालक एका गाडीतून 3 प्रवाशांची वाहतूक करतात. मात्र, त्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असून वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत 2 हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच 3 हजार टॅक्सी चालकांना ई-चलन बजावले असल्याचा आरोप मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने परिवहन विभागाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

व्यापारी, एअरपोर्टवर जाणारे प्रवासी, लांब पल्ल्यांच्या गाड्यातून प्रवास करणारे, कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचारी असे 70 टक्के प्रवासी हे टॅक्सी चालकांचे ग्राहक आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद झाल्याने मोठा फटका काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना बसला आहे. त्यात टॅक्सी चालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. टॅक्सी चालक व त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांचा विचार करावा. तसेच सरकारने 31 मे च्या अध्यादेशात बदल करून टॅक्सी चालकांना 2 अत्यावश्यक सेवेतील स्थानिक प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिवहन विभागाने नेमलेल्या उपसमितीकडे केल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रॉस यांनी दिली.

1975 साली मिसा (Maintenance of Internal Security Act) लावण्यात आला होता, त्यावेळी टॅक्सी चालकांवर अशी वेळ आली नव्हती. मात्र, या लॉकडाऊन कालावधीत टॅक्सी चालकांवर मिसापेक्षा वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यावर टॅक्सी चालकांना आर्थिक आधार देण्यासाठी समितीने शिफारस केल्याप्रमाणे किमान 3 रुपये भाडेवाढ करावी, असे क्वाड्रॉस यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल उपसमितीकडे प्राप्त झाला असून, येत्या सोमवारी त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता परिवहन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.