ETV Bharat / state

Bodybuilding Competition : टॅक्सीचालकाच्या मुलीने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पटकावला क्रमांक, ऑलिंपिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत गाण्याचे स्वप्न - Sharvari Godse wins bodybuilding competition

तुमच्या मनगटात जिद्द आणि यश मिळवण्याची धमक असेल तर यश तुमच्या मागोमागच येते. कांजूरमार्ग पूर्व येथे प्रेम नगर परिसरात राहणाऱ्या शर्वरी गोडसे हिला भेटल्यानंतर याचाच प्रत्यय आला आहे. शर्वरी हिने जिद्दीच्या जोरावर महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर टॅक्सी चालक असलेल्या आपल्या वडिलांचे नाव उज्वल केले आहे.

Bodybuilding Competition
शर्वरी गोडसे
author img

By

Published : May 14, 2023, 11:33 AM IST

Updated : May 14, 2023, 1:45 PM IST

शर्वरी चौथा क्रमांक मिळवण्यात यशस्वी

मुंबई : कांजूरमार्ग पूर्व येथील प्रेम नगर परिसरात राहणारी शर्वरी गोडसेला तिच्या आई-वडिलांनी आणि बहिणीने तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ दिले. मुंबई महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत बाजी मारलेल्या बाजी मारलेल्या शर्वरीने ई टीव्ही भारतशी बोलताना तिला मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय तिने तिच्या आई-वडिलांना आणि धाकटी बहिणीला दिले आहे. कारण आई आणि लहान बहिण तिच्या डाएटची काळजी घेते म्हणजेच तिला लागणारे सकाळचे मिल बनवण्यापासून ते तिला देण्यापर्यंत आई आणि धाकटी बहीण या दोघी लगबग करत असल्याची माहिती शर्वरीने दिली आहे. कांजूरमार्ग पूर्व येथील प्रेम नगर परिसरात राहणारे टॅक्सी चालक राजाराम गोडसे त्यांची मुलगी शर्वरीने मुंबई महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

शर्वरी चौथा क्रमांक मिळवण्यात यशस्वी : ग्रेटर बॉम्बे असोसिएशन तर्फे मुंबई महिला शरीरसौष्ठव स्पर्धा अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 15 महिला स्पर्धकांनी सहभागीतला होता. त्यात ग्रेटर बॉम्बे असोसिएशन कॅटेगरी मधील पहिल्या पाचमध्ये शर्वरी गोडसे ही चौथा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाली. मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण गावची असलेली शर्वरी मुंबईतील करी रोड येथे राहिली. त्यानंतर ती कांजूरमार्ग पूर्व येथील प्रेम नगरमधील शाळेत कुटुंबासह राहते. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये शिकत असताना शर्वरीने कबड्डी या खेळात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. लहानपणापासूनच शर्वरीला वेगवेगळ्या खेळांची आवड असल्याने तिने शरीर सौष्ठव या अवघड आणि स्त्रियांसाठी आव्हानात्मक असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. खेळाबरोबरच शर्वरी अभ्यासात देखील अव्वल असल्याचे तिला दहावीत मिळवलेल्या गुणांवरून कळून येते. दहावीत शर्वरीला बोर्डाच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळाले होते.

ऑलिंपिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत गाण्याचे स्वप्न : फिटनेस ट्रेनर तसेच वेगवेगळ्या खेळांची आवड असणाऱ्या शर्वरी गोडसे हिने 2016 ला बॅटमॅन बॅडमिंटन पट्टू पी व्ही सिंधूला ऑलम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करताना पाहिले. त्यावेळी शर्वरीने देखील आपण भारतासाठी ऑलम्पिकमध्ये नेतृत्व करून सुवर्णपदक मिळवण्याची जिद्द उराशी ठेवली आहे. ऑलिंपिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत गाण्याचे तिचे स्वप्न लवकरच पूर्ण होवो यासाठी ईटीव्ही भारतकडून तिला खूप शुभेच्छा.

1. हेही वाचा : Today Gold Silver Rate: सोन्याच्या किमतीत वाढ, तर चांदीच्या किमतीत घट; काय आहेत आजचे पेट्रोल डिझेल, क्रिप्टोकरन्सीचे दर

2. हेही वाचा : Akola Crime : 2 गटातील दगडफेकीत एकाचा मृत्यू दहा जखमी, अकोल्यात कलम 144 लागू

3. हेही वाचा : Mothers Day : 'असा' साजरा करा मदर्स डे; आईला देऊ शकता 'हे' गिफ्ट्स

Last Updated : May 14, 2023, 1:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.